Canacona Murder Case Dainik Gomantak
गोवा

Canacona Murder Case: काब-दी-राम येथे पत्नीचा खून करणाऱ्या पती गौरवला पाच दिवसांची पोलीस कोठडी

मूळचा लखनऊ येथील असणारा संशयित गौरव एका नामांकीत हॉटेलमध्ये मॅनेजर आहे.

Pramod Yadav

Canacona Murder Case: दक्षिण गोव्यातील काब-दी-राम येथे पत्नीचा खून केल्या प्रकरणी गौरव कटियार याला अटक कुंकळ्ळी पोलिसांनी केली. गौरवला न्यायालयासमोर उभे केले असता त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

मूळचा लखनऊ येथील असणारा संशयित गौरव एका नामांकीत हॉटेलमध्ये मॅनेजर आहे. शुक्रवारी (दि.19) दुपारी त्याने पत्नीचा समुद्रकिनारी खून केल्याचे उघडकीस आले आहे.

संशयित गौरवने दुपारच्या सुमारास 27 वर्षीय पत्नी दीक्षा गंगवार हिचा खून केला. पोलिसांनी गौरवची चौकशी केली असता ती आईस्क्रीम खरेदी करण्यासाठी गेली असता अपघाताने पाण्यात बुडाली, असे सांगितले.

दरम्यान, सखोल चौकशीअंती गौरवने पत्नीचा खून केल्याचे समोर आले आहे. पोलिसांना संशय येऊ नये म्हणून त्याने अपघाताचा बनाव केला, असे तपासातून समोर आले. घटनेचा एका स्थानिकाने चित्रित केलेला व्हिडिओ देखील समोर आला आहे.

का केला पत्नीचा खून

अटक पती गौरवचे विवाह बाह्य संबंध असल्याचे तपासातून समोर आले आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला होता. यातूनच त्याने पत्नीचा खून करण्याचा कट रचल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT