Goa crime news today Dainik Gomantak
गोवा

Goa Murder Case: तलवारीने केला हल्ला, डिचोलीत पतीकडून पत्नीची हत्या

Goa Murder Case: पतीने पत्नीवर तलवारीने हल्ला करुन खून केल्याची धक्कादायक घटना उत्तर गोव्यातील डिचोलीत घडली आहे.

Pramod Yadav

डिचोली: गोवा विधानसभेत राज्यातील वाढलेल्या गुन्हेगारी घटनांबाबत चिंता व्यक्त केली जात असताना डिचोलीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पतीने पत्नीची हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास न्यूवाडा - रोलिंगमिल येथे ही घटना घडली. घटनेनंतर संशयित पतीने पोलिसांकडे आत्मसमर्पण केले आहे.

मैन्नुद्दीन हवानगी (वय ३२) असे या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयित पतीचे नाव आहे. तर, रबिया हवानगी (२४) असे मृत पत्नीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मैन्नुद्दीन याने पत्नीवर तलवारीने हल्ला करत तिच्या छाती, मान आणि शरीरिराच्या इतर भागावर गंभीर दुखापत केली. जखणी रबियाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले दरम्यान, येथेच तिचा मृत्यू झाला.

जोडप्यांत वारंवार वाद होत असून, त्यांच्यात घटस्फोटाची चर्चा सुरु होती. संशयित मैन्नुद्दीन अमली पदार्थांच्या आहारी गेला होता. शुक्रवारी रबिया मुलीला खासगी शिकवणीला सोडून माघारी येत असताना पतीने तिला रस्त्यात अडवून तलवारीने हल्ला केला. संशयित मैन्नुद्दीन याने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले असून, याप्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT