Goa Murder Case Dainik Gomantak
गोवा

Goa Murder Case: वास्कोत घरगुती वादातून पत्नीचा खून, पती पोलिस स्थानकात हजर

Goa Murder Case: सध्या गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असून, पोलिस अधिक तपास करत आहेत.

Pramod Yadav

Goa Murder Case

शांतीनगर वास्को येथे पतीने डोक्यावर लोखंडी रॉडने वार करून पत्नीचा खून केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी संशयिताला वास्को

पोलिसांनी अटक केली आहे. शांतीनगर वास्को येथील रहिवाशी चाळोबा केसरकर याने आपली पत्नी वैशाली (वय ३९) हिच्या डोक्यावर लोखंडी रॉडने वार करून हत्या केली. ही घटना आज (दि. २४ मे) दुपारी दीडच्या दरम्यान घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, चाळोबा व त्याची पत्नी वैशाली यांच्यात गेल्या तीन वर्षांपासून खटके उडत होते. चाळोबा आपल्या पत्नीला मारबडव करत होता, असे वैशालीच्या वडिलांनी सांगितले.

तसेच बरे वाईट काही घडू नये म्हणून वडील स्वतः तिच्या घरात जाऊन रात्री झोपत होते. वैशालीला एक मुलगा असून यंदा तो दहावीत उत्तीर्ण झाला आहे.

रोज उडत होते खटके

आज दुपारी पती - पत्नीमध्ये जोराचे भांडण झाले. त्यात चाळोबाने वैशालीच्या डोक्यावर रॉडने वार केला. ती रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळली व तिचा जागीच मृत्यू झाला. हे कृत्य करून नवरा तसाच घरीच राहीला.

शेजाऱ्यांनी आरडाओरड ऐकून त्यांच्या घरात प्रवेश केला असता वैशालीचा खून झाल्याचे उघडकीस आले. वास्को पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक कपिल नायक व इतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले व संशयिला ताब्यात घेऊन नंतर त्याला अटक केली. वास्को पोलिस पुढील तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT