Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: सासू-भावजयीच्या त्रासामुळे 23 वर्षीय विवाहितेने संपवला जीव, हुंड्यासाठी केला छळ; न्यायालयाने फेटाळला जामीन

Goa Dowry Harassment Case: अनिता राठोड हिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याची तक्रार तिच्या माहेरच्या कुटुंबीयांनी मांद्रे पोलिस स्थानकात दाखल केली होती.

Sameer Panditrao

पणजी: हुंडाबळीसाठी अनिता राठोड हिच्या सासरच्या कुटुंबीयांनी छळ करून आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी सासू संशयित निर्मला कुशल राठोड (५३) व भावजय सुजाता कुशेलप्पा राठोड (२७) या दोघींना मेरशी येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश क्षमा जोशी यांनी फेटाळला.

त्यांच्याविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यासाठी जन्मठेप तसेच इतर संशयित न्यायालयीन कोठडीत आहेत. त्याना अटकेची माहिती व कारण पोलिसांनी दिले होते असे न्यायालयाने जामीन फेटाळताना निरीक्षण केले आहे.

अनिता राठोड हिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याची तक्रार तिच्या माहेरच्या कुटुंबीयांनी मांद्रे पोलिस स्थानकात दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी अनिता हिचा पती अनिल राठोड तसेच त्याच्या कुटुंबातील सुजाता राठोड, निर्मला राठोड, रमेश राठोड, कुशेलप्पा राठोड या सर्वांविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली होती.

संशयितांनी हा गुन्हा समान हेतूने व योजनाबद्धरित्या केल्याचा पोलिसांचा संशय आहे. सुजाता व निर्मला या दोघींनी अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्ज फेटाळण्यात आला होता. त्यांच्या अटकेची माहिती तसेच त्यामागील कारण याची माहिती भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम ४७ खाली देण्यात आली होती. जामिनासाठी अर्ज केलेल्या संशयिताविरुद्ध दाखल असलेला गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे.

गळफास घेऊन आत्महत्या...

खालचावाडा - हरमल येथे मार्च २०२५ मध्ये एका २३ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. पोलिसांनी याप्रकरणी सुरुवातीला नैसर्गिक मृत्यूची नोंद केली होती. मात्र, तिला सासरच्या कुटुंबीयांनी हुंड्याठी छळ करून तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप केला होता व खुनाचा आरोप दाखल करण्याची मागणी करून गोव्यातच ठाण मांडले होते. पेडणे उपजिल्हाधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिल्यानंतर मांद्रे पोलिसांनी आठ दिवसांनी सासरच्या कुटुंबीयांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SIR Guidelines: 'एसआयआर'च्या मार्गदर्शक तत्त्वांना सुप्रीम कोर्टाची कायदेशीर मान्यता? निवडणूक आयोगाच्या वकिलांचा दावा; गोवा खंडपीठात आजही सुनावणी सुरु

SCROLL FOR NEXT