Navelim Crime News Dainik Gomantak
गोवा

Navelim Crime News: पत्नीच्या वादाला कंटाळून नवऱ्याने घेतला गळफास! नावेलीतील घटना

पोलिसांनी या घटनेची अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे.

Kavya Powar

Navelim Crime News: नावेलीमध्ये भाड्याच्या घरात राहणाऱ्या एका युवकाने कौटुंबिक जाचाला कंटाळून गळफास घेत आपले जीवन संपवले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सोनूकुमार साहनी (33) हा मूळचा बिहारचा असून काही कालावधीपासून कामानिमित्त तो आणि त्याची पत्नी नावेलीमध्ये राहत होते.

मिळालेल्या माहितीनुसार, सोनूकुमार आणि त्याच्या पत्नीमध्ये सतत वाद व्हायचे. पत्नीच्या जाचाला कंटाळून त्याने गळफास लावला असल्याचे म्हटले जात आहे.

आत्महत्येची माहिती मिळाल्यानंतर मडगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला असून तो मडगावातील सरकारी शवागृहात ठेवण्यात आला आहे.

कौटुंबिक वादामुळे पीडित मानसिक तणावाखाली असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, पोलिसांनी या घटनेची अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Chorla Ghat Traffic: चोर्ला घाटात जीव धोक्‍यात, डंपरांचा सुळसुळाट! वाहतूक कोंडीसह अपघातांचा धोका; बेळगावला खरेदीला जाणं बनलं कठीण

Omkar Elephant Goa: ‘ओंकार’ तोरसे, तांबोसेत घुसण्याच्या तयारीत, पिकांची हानी! तातडीने बंदोबस्ताची शेतकऱ्यांची मागणी

Goa Water Crisis: राज्यात पाणी संकट गडद! जलाशयांनी गाठला तळ; साळावलीत 48 टक्के, तर अंजुणेत 31 टक्के पाणी बाकी

Goa Drug Menace Crisis: अमली पदार्थांचा विळखा आता थेट शाळांपर्यंत! किनारपट्टीपासून गावागावांत ड्रग्जचं जाळं पसरलं तरी सरकार 'ढिम्म'; सरदेसाईंचा घणाघात

कदंब बसस्थानकात खासगी बसचालकांची मनमानी! म्हापशात प्रवासी, वाहनधारक त्रस्त: नागरिकांकडून कारवाईची जोरदार मागणी

SCROLL FOR NEXT