Husband arrested for beating wife to death

 

Dainik Gomantak 

गोवा

पत्नीला मारहाण करुन खून करणाऱ्या नराधम पतीला अटक

पत्नीला बेदम मारहाण करून तिचा खून करण्याचा आरोप असलेल्या पती सागर तिंबाडीया (29) याला आज सकाळी मडगाव पोलिसांनी (Margao Police) अटक केली.

दैनिक गोमन्तक

मडगाव: पत्नीला बेदम मारहाण करून तिचा खून करण्याचा आरोप असलेल्या पती सागर तिंबाडीया (Sagar Timbadiya) (29) याला आज सकाळी मडगाव पोलिसांनी (Margao Police) अटक केली. या प्रकरणी सागर याच्यावर खुनाचा आरोप दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस निरीक्षक दितेंद्र नाईक (Ditendra Naik) हे तपास करीत आहेत. रावणफोंड येथील नालंदा अपार्टमेंटमध्ये 10 डिसेंबर रोजी रात्री हा प्रकार घडला होता. अस्त्याव्यस्थ परिस्थितीत पत्नीला रात्री बाराच्या सुमारास जिल्हा इस्पितळात (District Hospital) आणले असता तिला मृत घोषित करण्यात आले होते. बाळाचे कपडे धुण्यासाठी बाथरुममध्ये गेली असता ती जिन्यावरून खाली पडून ती जखमी झाल्याचा बनाव सुरवातीला तिचा पती सागर याने केला होता.

मात्र मृतदेहाची उत्तरीय तपासणी केली असता मयताच्या अंगावर 40 पेक्षा जास्त जखमा सापडल्याने तसेच सहा ठिकाणी चावे घेतल्याचे आढळून आल्याने मारहाण झाल्याने तिला मृत्यू आल्याचे निदर्शनास आल्यानंतर उपजिल्हाधिकारी प्रसाद वळवईकर (Prasad Valvaikar) यांच्या तक्रारीवरून काल रात्री मडगाव पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंद केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Supreme Court: स्वतःच्या इच्छेनं देहव्यापार करणं गुन्हा नाही! वेश्याव्यवसायावर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; काय नेमकं प्रकरण?

Goa land Zoning: 17 गावांतील सुमारे 2.01 कोटी चौरस मीटर जमीन 'NDZ'मध्‍ये; सूचना, हरकतींसाठी 30 दिवसांची मुदत; टीसीपीचा निर्णय

IPL 2026: कॅप्टन रजत पाटीदारचा मास्टरस्ट्रोक; आरसीबीने सलग दुसऱ्यांदा जिंकले आयपीएलचे जेतेपद!

Goa Comunidade land: जमीन घोटाळा प्रकरणी सावंत गावकर आक्रमक; सर्वण कोमुनिदादची जमीन, गावकऱ्यांनी अखेर उभारला फलक

Domestic Violence Case: 4 तास अघोरी छळ आणि जीवघेणा ड्रामा! हिस्ट्रीशीटरचा बायकोवर अमानुष अत्याचार; 25 वर्षीय नराधमाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

SCROLL FOR NEXT