Goa Heavy Rain Dainik Gomantak
गोवा

Goa Heavy Rain: साळ-खोलपेवाडी येथे घरावर कोसळला वृक्ष; दोन लाखांच्या मालमत्तेचे नुकसान, अग्निशमन दलाकडून मदतकार्य सुरू

Tree Falls on House Goa: पावसाच्या तडाख्यात साळ पंचायत क्षेत्रातील खोलपेवाडी येथे एका स्लॅबच्या घरावर भलामोठा ''केळ'' नामक वृक्ष कोसळला.

दैनिक गोमन्तक डिजिटल

डिचोली: पावसाच्या तडाख्यात साळ पंचायत क्षेत्रातील खोलपेवाडी येथे एका स्लॅबच्या घरावर भलामोठा ''केळ'' नामक वृक्ष कोसळला. या पडझडीत कोणताही अनर्थ घडला नसला, तरी दोन लाखाहून अधिक रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

झाड कोसळण्याची ही घटना काल (शुक्रवारी) रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. खोलपेवाडी येथील दयानंद नानोसकर यांच्या घरावर हे झाड कोसळले. डिचोली अग्निशमन दलाला या घटनेची माहिती मिळताच दलाचे उपअधिकारी व्ही. डी. गावकर, शिवाजी नाईक आणि महेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली.

जवानांनी मदतकार्य करून घरावर पडलेले झाड हटवले. त्यासाठी ‘क्रेन’ची मदत घेण्यात आली. शुक्रवारी मद्यरात्री सुरु केलेले काम शनिवारी दुपारपर्यंत पूर्ण करण्यात आले. झाड कोसळले, त्यावेळी घरातील मंडळी जागी होती. भलामोठा वृक्ष घरावर कोसळताच घराला सौम्य हादरा बसला. लागलीच घरातील मंडळी भयभीत होऊन घराबाहेर आली.

झाडाच्या धक्क्याबरोबर घराच्या मागील बाजूने जोडून असलेल्या भाड्याच्या खोलीच्या छप्परावरील सिमेंटचे पत्रे फुटले. सुदैवाने या पडझडीत अन्य कोणताही अनर्थ घडला नाही. या पडझडीत दोन लाखाहून अधिक रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले, अशी माहिती घरमालक नानोसकर यांनी सांगितले.

पडझडीची पाहणी!

घराशेजारील धोकादायक झाड कापावे, अशी तक्रार स्थानिक पंचायतीसह प्रशासकीय यंत्रणांकडे केली होती. तर दुसऱ्याबाजूने काल कोसळलेल्या झाडासह अन्य धोकादायक झाडे कापावीत, अशी मागणी स्थानिक पंचायतीने दीड वर्षांपूर्वी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. मात्र प्रशासकीय यंत्रणांनी याकडे दुर्लक्ष केल्यानेच कालची घटना घडली, अशी खंत घरमालकाने व्यक्त केली. झाड कोसळल्याची माहिती मिळताच आज सकाळी पंचसदस्य मनोहर शिंदे यांच्यासह तलाठ्यांकडून घराच्या पडझडीची पाहणी करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT