Goa Casino  Dainik Gomantak
गोवा

Explained: कॅसिनोमुळे पणजीच्या बजेट हॉटेल मालकांना कसा होतोय फायदा?

कॅसिनोमध्ये जुगार खेळण्यासाठी गोव्यात येणारे बहुतेक लोक उच्चभ्रू फॅमिलीतील असतात

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Casino देशभरातील लोकांनी पर्यटनासोबतच गोव्यातील कॅसिनोला आपली पसंती दर्शवली आहे. 'श्रीमंत लोकांचा जुगार' म्हणून समजला गेलेला गोव्यातील कॅसिनो व्यवसाय वर्षाचे बाराही महिने सुरु असून दिवसेंदिवस कॅसिनोमध्ये जुगार खेळण्यासाठी गोव्यात येणाऱ्या ग्राहकांच्या संख्येत वाढ होतेय.

त्यामुळेच आवश्यकता भासल्‍यास गोवा राज्य ‘कॅसिनो कॅपिटल’ (Casino) म्हणून प्रमोट केले जाईल, असे केंद्रीय पर्यटन आणि संस्कृती मंत्री जी. किशन रेड्डी यांनी काही वर्षांपूर्वी गोव्यात सांगितले होते.

कॅसिनोमध्ये सर्व प्रकारच्या आलिशान अश्या सोयी-सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून दिल्या जातात. साहजिकच कसिनोमध्ये जुगार खेळण्यासाठी गोव्यात येणारे बहुतेक लोक उच्चभ्रू फॅमिलीतील असतात.

त्यामुळे ते पणजीत आल्यावर राहण्यासाठी येथील हॉटेल्स बुक करतात. अर्थात त्यामुळे पणजी शहराला लागून वाहणाऱ्या मांडवी नदीतील या कॅसिनोमुळे पणजी आणि लगतच्या भागातील हॉटेल व्यवसाय चांगलाच तेजीत आला आहे.

पणजीतील 1 BHK, 2 BHK तसेच AC - Non AC या प्रकारातील या हॉटेल्स मधील रूम्सचे दर एक हजारापासून ते अगदी तीन हजारांपर्यंत आहेत.

तसेच रूममध्ये राहणाऱ्यांची संख्या, बुक केलेल्या रूम्सची संख्या आणि दिवसांच्या संख्येनुसार रूम्सचे दर बदलत असल्याचे येथील हॉटेल्स व्यवस्थापनाकडून सांगण्यात आलेय.

कॅसिनोमुळे फक्त हॉटेल्स मालकांचा धंदा तेजीत होतो असं नाही तर हॉटेल्समध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील आर्थिक लाभ होतोय.

पर्यटकांनी भाड्याने घेतलेल्या वाहनांमधून, बोट क्रूझसाठी खरेदी केलेल्या तिकिटांमधून आणि इतर अनेक गोष्टींमधून या हॉटेल्सच्या स्टाफ मेम्बर्सना कमिशन मिळते.

तसेच पर्यटकांना हॉटेल्समध्ये आणणाऱ्यांना 20 टक्के रनिंग कमिशन देत असल्याचे हॉटेल मालकांकडून सांगण्यात आले. थोडक्यात मांडवी नदीवरील या ऑफशोअर कॅसिनोमुळे गोव्यातील हॉटेल्सचा धंदा तेजीत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: चिकन-मटन विसरा, इथे मिळतात चक्क 'कोब्रा सापाचे भजी अन् समोसे', खवय्यांची होते मोठी गर्दी; व्हिडिओ पाहून चक्रावले नेटकरी

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

SCROLL FOR NEXT