Rowing At National Games Dainik Gomantak
गोवा

National Games: शापोरा नदीतील रोइंग स्पर्धेसाठी गोव्यातील शेतकऱ्यांनी कशी मदत केली? मोबदलाही नाकारला

राज्यात अद्याप रोइंग खेळासाठी पायाभूत सुविधा निर्माण झाल्या नाहीत.

Pramod Yadav

National Games Goa 2023 Rowing: गोव्यात सध्या 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेची धामधूम सुरु आहे, राज्याची राजधानी पणजीपासून सुमारे 20 किमी अंतरावर असलेल्या शापोरा नदीजवळ रोइंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

राज्यात अद्याप रोइंग खेळासाठी पायाभूत सुविधा निर्माण झाल्या नाहीत. रोइंगसाठी स्थिर पाणी आणि दोन किलोमीटर किंवा त्याहून अधिक सरळ कोर्स आवश्यक असतो.

खेळासाठी आवश्यक अटी पूर्ण करू शकतील अशी जागा शोधण्यास खूप वेळ लागला. नदीच्या काठावर किंवा आजूबाजूला कोणतीही रिकामी जमीन नसल्यामुळे आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करणे आव्हानात्मक होते. राज्यात सध्या भात कापणीचा हंगाम असूनही स्थानिक शेतकरी सरकारच्या मदतीसाठी पुढे आले.

रोइंग स्पर्धेसाठी केवळ दोन दिवसात जवळपास 23 शेतकर्‍यांनी आपली जमीन मोकळी केली. तसेच, नदीपात्रापर्यंत काँक्रीटचा रस्ता बांधण्यासाठी, जमीन सपाटीकरण आणि 5,000 चौरस मीटर जमीन मोकळी करण्यास जवळपास 30,000 चौरस मीटर जमीन अधिकाऱ्यांना उपलब्ध करुन दिली.

'प्रत्येक नवीन जागेची काही आव्हाने असतात. मात्र येथे गेल्या दहा दिवसांपासून जमिनीचे सपाटीकरण, तात्पुरत्या पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे काम युद्धपातळीवर करावे लागले. जमिनीचे जास्त नुकसान होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक होते,' असे रोइंग स्पर्धेचे संचालक इस्माईल बेग यांनी सांगितले.

शासनाने शेतकर्‍यांना नुकसान भरपाई द्यायचे ठरवले, मात्र अनेकांनी त्याबदल्यात काहीही मागितले नाही. राज्याचे क्रीडा मंत्री गोविंद गावडे यांनी याबाबत शेतकऱ्यांचे कौतुक केले आहे. शेतकऱ्यांच्या या सहकार्याबद्दल आम्ही शेतकऱ्यांचे आभारी आहोत, असे क्रीडामंत्री म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT