Honda Rain  Dainik Gomantak
गोवा

Goa Monsoon: आमदार दिव्या राणे यांच्या मनाचा मोठेपणा, पावसात पडझड झालेल्या घरांची दुरुस्ती करुन देणार

Goa Rain: शिंदे कुटुंबाला सुमारे एक लाख चाळीस हजार रुपयांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज

गोमन्तक डिजिटल टीम

गेल्या अनेक दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे होंडा भागात बऱ्याच घरांची पडझड झाली आहे, यामुळे नागरिकांना बराच फटका बसला असल्याने नुकसानीला सामोरे जावे लागले आहे.

भुईपाल कॉलनी येथील निर्मला सखाराम शिंदे या महिलेच्या घराचा काही भाग काल कोसळल्याने शिंदे कुटुंबीयांवर संकट कोसळले आहे, परंतु या घटनेची तात्काळ दखल घेत पर्ये मतदारसंघाच्या आमदार डॉ. दिव्या राणे यांनी हे घर तातडीने दुरुस्ती करण्याची जबाबदारी घेतली आहे.

या भागात राहणाऱ्या निर्मला सखाराम शिंदे या फुल विक्रीचा व्यवसाय करून आपल्या संसाराचा गाडा हाकत आहेत. त्यांची आर्थिक स्थिती बेताचीच असल्याने त्या मातीच्या भिंतीच्या घरात रहात होत्या. सध्या पडणाऱ्या मुसळधार पावसाच्या तडाख्याने या घराच्या मातीच्या भिंतींना तडे जाऊन काही भाग कोसळला आहे.

या घटनेची माहिती होंडा तलाठी संतोष गावस यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन या घराचा पंचनामा करून नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत अहवाल तयार केला आहे. शिंदे कुटुंबाला सुमारे एक लाख चाळीस हजार रुपयांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT