Cortalim Landslide Dainik Gomantak
गोवा

Lanslide In Goa: कुठ्ठाळीत पुन्हा भूस्खलन; दरड कोसळून मोठे नुकसान

Cortalim Landslide: मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांचे स्वीय सचिव क्लीफ वाझ यांच्या घरावर दरड कोसळून घराची मोठ्या प्रमाणात हानी झाली

गोमन्तक डिजिटल टीम

कुठ्ठाळी येथे आज मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांचे स्वीय सचिव क्लीफ वाझ यांच्या घरावर दरड कोसळून घराची मोठ्या प्रमाणात हानी झाली. यात क्लीफ यांच्या आई थोडक्यात बचावल्या.

पंधरा दिवसापासून सतत पडणाऱ्या पावसामुळे झाडांची पडझड तसेच भूस्खलनाचे प्रकार घडत आहेत. आज दुपारी १२ च्या सुमारास कुठ्ठाळी येथे क्लीफ वाझ यांच्या घरावर दरड कोसळून घराची हानी झाली.

सदर दरड कोसळण्याच्या अगोदर क्लीफ यांच्या आईला मोठा आवाज ऐकू आला. यावेळी ती स्वायंपाक घरात काम करत होती. आवाज येताच ती स्वयंपाक घरातून बाहेर गेली व नेमकी स्वयंपाक घरावरच दरड कोसळली. कौलारू घर असल्याने घरात माती, दगड आले. तसेच एक मोठा दगड घरावर येऊन स्थिरावला.

दरम्यान याची माहिती मिळताच आमदार आंतोन वाझ तसेच मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. यावेळी अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी येऊन अडथळा दूर केला.

दरम्यान, गेल्या आठवड्यात कुठ्ठाळी येथे जंक्शनवर मोठे भूस्खलन झाले होते. आता कुठ्ठाळी येथे आज ही दुसरी घटना. आमदार वाझ यांनी तिथे संरक्षक भिंत बांधण्यात येईल, असे सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: 'त्या' नराधम बापाला कोर्टाचा मोठा दणका! अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी ठोठावली 20 वर्षांची शिक्षा; 1.30 लाखांचा दंड

Telangana Accident: किंकाळ्या अन् आक्रोश! अनियंत्रित बसची कंटेनरला जोरदार धडक, 6 ठार, 20 जखमी; तेलंगणात भीषण अपघात

Goa Drug Racket: आशा, रोविनानंतर आता पोक्सो कैदी योगेश मांद्रेकरही अटकेत; कोलवाळ जेल ड्रग्स प्रकरणात तिसरी कारवाई

Goa Municipal Elections: विधानसभेपूर्वीच पालिका निवडणुका! 11 नगरपालिकांसाठी कोर्टाचा मोठा आदेश, 4 जानेवारीपर्यंत निकाल

Operation Sindoor: ''शेवटचा वार भारताचाच असणार होता''!, 'ऑपरेशन सिंदूर'बाबत माजी CDS अनिल चौहान यांचा धक्कादायक खुलासा; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानची दैना VIDEO

SCROLL FOR NEXT