House number obtained by erecting huts at Keri  Dainik Gomantak
गोवा

केरी येथे झोपड्या उभारून मिळवले घर क्रमांक

धक्कादायक प्रकार:  वाघेरीतील जमीन विक्री व्यवहार रद्द करण्याची मागणी

दैनिक गोमन्तक

पणजी:  सत्तरीतील केरी गावामध्ये येणाऱ्या सर्व्हे क्रमांक 102/1  या वाघेरी डोंगरावरील जमीन विक्री बेकायदेशीर असल्याने सर्व खरेदी-विक्री व्यवहार रद्द करावेत, अशी मागणी पर्यावरणप्रेमींनी केली आहे. धक्कादायक म्हणजे, या जागांवर झोपड्या उभारून केरी पंचायतीकडून घर क्रमांक मिळवले आहेत.

गेल्या वर्षभरात वाघेरी येथील डोंगरावरील हजारो चौरस मीटर जागेची सातजणांना विक्री केली आहे. त्यातील सहा खरेदीदार हे परप्रांतीय आहेत. या जमीन विक्रीचा मसुदा वाळपईतील उपनिबंधक कार्यालयात झाला आहे. 

माहिती हक्कानुसार मिळवलेल्या माहितीनुसार वाघेरी डोंगरावरील जमीन ही 50,02,875 चौरस मीटर असून त्यांचे 21 जमीनमालक आहेत. त्यांची त्यावर सामूहिक मालकी आहे. जेव्हा एखादी जमीन सामूहिक मालकीची असते, तेव्हा जमीन विक्री करताना इतर सहमालकांची मान्यता घेणे बंधनकारक असते. पण वाघेरीवरील प्रकारात अशी मान्यता घेतलेली नाही. त्यामुळे ती बेकायदा ठरते. त्याचप्रमाणे जेव्हा एखादी सामूहिक जमीन विकताना ती रेखांकित करणे आवश्यक असते. पण या व्यवहारावेळी अशी कोणतीही प्रक्रिया केलेली नाही. त्याचप्रमाणे अशा प्रकारची जमीन विक्री करतेवेळी नगर नियोजन खात्याची परवानगी घेण्याची आवश्यकता असते. पण या सात ही विक्रीदाराने या खात्याची परवानगी घेतलेली नाही. त्यामुळे ही जमीन विक्री बेकायदा ठरते. वाघेरीवर घर क्रमांक कसे दिले?

घर क्रमांक मिळवण्याची प्रक्रिया संशयास्पद

वाघेरीवर 2007 ते 2010 या काळात या पाच झोपड्या उभारल्या आणि त्यात ते मालक राहातात, अशी माहिती पंचायतीला देऊन घर क्रमांक मिळवले आहेत. झोपड्या उभारलेली जागा ही सर्वेक्षण नकाशावर दाखवलेली नाही. त्यामुळे घर क्रमांक मिळवण्याची प्रक्रियाच संशयास्पद आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: माहेरी गेलेली बायको परत आली नाही, नैराश्यातून तीन पोरींचा जीव घेऊन स्वतःला संपवलं; सुधाकरनं ओलांडली 'क्रूरतेची सीमा'

PM Kisan Nidhi 23rd Installment: पीएम किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता उद्या खात्यात! यादीत नाव नसल्यास पैसे अडकू शकतात, आत्ताच अशी करा पडताळणी

Goa Development: गोव्यासाठी दिल्लीतून सुटला तब्बल 2000 कोटींचा निधी! केंद्र आणि राज्य सरकार मिळून गोव्याचा चेहरामोहरा बदलणार; कामतांचा विश्वास

Goa Tourism: 'पर्यटनात विविधता, कुशल मनुष्यबळ निर्मितीवर सरकारचा भर', राज्यात 5 नवीन महाविद्यालयांची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

Goa Water Crisis: "गोव्यातील पाणीटंचाईला सावंत सरकारच जबाबदार", युरी आलेमाव यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT