Margao Fire Dainik Gomantak
गोवा

Margao Fire : मडगावात अग्नितांडव; घरात साठवलेली लाखोंची सुकी मासळी जळून खाक

या आगीत लाखो रुपयांचं सामान जळून खाक झालं आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

मडगावात आज भल्या पहाटे घराला आग लागल्याची घटना घडली आहे. मडगाव शहरातील गांधी मार्केट परिसरात असलेल्या घराला आग लागली. या आगीत लाखो रुपयांचं सामान जळून खाक झालं आहे. मडगाव येथील गांधी मार्केटच्या मागच्या बाजूला असलेले रफिक बेपारी यांच्या दुकानाला आणि घराला आज पहाटे आग लागून सुमारे 4 लाखांची हानी झाली.

आज बुधवारी पहाटे साडेचार वाजता ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. आग लागली त्यावेळी घरात कुणी नसल्याने ती कशी लागली हे कळू शकले नाही. शेजाऱ्यांनी अग्निशमन दलाला बोलावून ही आग आटोक्यात आणली. या दुकानाला लागूनच बेपारी यांचे घर आहे. या दुकानात मोठ्या प्रमाणावर सुकी मासळी साठवून ठेवली होती. ती या आगीत खाक झाली. घरात असलेला टीव्ही, फ्रिज आदी उपकरणेही खाक झाली

दरम्यान गोव्यात मागील काही दिवसांमध्ये आगीच्या घटनांमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे. त्यातच सोमवारी रात्री उशिरा म्हापसा करासवाडा येथे एका दुकानाला आग लागून ते जळून खाक झालं. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती मिळत आहे.

म्हापसा करासवाडा येथे सोमवारी रात्री अचानक एका दुकानाला आग लागली. भरवस्तीत असलेल्या दुकानाला आग लागल्याने एकच गोंधळ उडाला. या आगीची माहिती तातडीने म्हापसा अग्निशमन दलाला देण्यात आली. घटनेचं गांभीर्य लक्षात घेत लगेच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवलं. मात्र तोपर्यंत दुकान जळून खाक झालं होतं.

दिनेश हरमलकर यांच्या मालकीचं हे दुकान असल्याची माहिती असून ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचं बोललं जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT