Guleli Dhamse House Dainik Gomantak
गोवा

Guleli Dhamse: वादळी वाऱ्या-पावसामुळे धामसेत घरावर पडले झाड; विजेच्या खांबांचे, बागांचे नुकसान

Guleli Dhamse News: सत्तरी तालुक्यातील गुळेली ग्रामपंचायत क्षेत्रातील धामसे या गावातील नारायण नाईक यांच्या घराचे तसेच मालमत्तेचे झाडे पडल्याने नुकसान झाले.

गोमन्तक डिजिटल टीम

वाळपई: वादळी वाऱ्या-पावसामुळे सत्तरी तालुक्यातील गुळेली ग्रामपंचायत क्षेत्रातील धामसे या गावातील नारायण नाईक यांच्या घराचे तसेच मालमत्तेचे झाडे पडल्याने नुकसान झाले.

त्यांच्या सर्व्हे क्रमांक ११/२६ येथील राहत्या घरावर वादळी पावसामुळे झाड पडले. त्यांच्या घराला विद्युत पुरवठा करणारे सिमेंटचे खांबदेखील पडले. तसेच त्यांच्या केळीच्या व सुपारीच्या बागायतीचे नुकसान झाले.

सत्तरी तालुका उपजिल्हाधिकाऱ्यांनी आपत्कालीन यंत्रणेमार्फत त्यांच्या घराची तसेच झालेल्या नुकसानीची तत्काळ पाहणी करावी. सरकारने या घटनेची दखल घेऊन नुकसान भरपाईसाठी कार्यवाही करावी, अशी मागणी नाईक यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rainforest Challenge 2025: खडकाळ वाटा, पाणथळ रस्ता आणि 'रेनफॉरेस्ट चॅलेंज'चा थरार..

America Arms Supply: अमेरिकेने दिली पाकला शस्त्रे! भारताची आक्रमक भूमिका; 1971 ची बातमी केली Twit

Goa Assembly Live: एलईडी मासेमारी आणि बुल ट्रॉलिंगवर कारवाई करण्यासाठी एक संयुक्त यंत्रणा तयार

Illegal Gambling: गोव्याच्या कॅसिनोत मोठी कारवाई! 11 जणांना अटक; 35 लाखांचा मुद्देमाल जप्त

Bicholim News: 10 गुरांचे बळी, वाहनचालक गंभीर जखमी; डिचोलीत भटक्या जनावरांमुळे अपघातांचा धोका

SCROLL FOR NEXT