Goa Monsoon Landslide  Dainik Gomantak
गोवा

Goa Rain: दरड कोसळून गेल्या वर्षी बांधलेल्या घराचे नुकसान

Goa Monsoon: स्थानिकांनी अडकलेल्या बैलाला सुरक्षित बाहेर काढले

गोमन्तक डिजिटल टीम

मुसळधार पावसामुळे नाळ्ळे-केरी येथे दरड कोसळल्याने दत्तानंद गावडे यांच्या घराच्या मागील भागाचे नुकसान झाले. दरम्यान, कोसळलेल्या दरडीखाली एक बैल अडकल्याने बरीच तारांबळ उडाली. अखेर स्थानिकांनी प्रयत्न करून बैलाला सुरक्षित बाहेर काढले.

गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने घराच्या मागील भागात त्यावेळी कोणी नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला. दत्तानंद व त्यांची बायको घराच्या समोरच्या भागात होते. यात घराचे सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे घरमालक गावडे यांनी सांगितले.

गावडे यांच्या शौचालयाचे व मागील खोलीचे नुकसान झाले आहे. गावडे यांनी गेल्या वर्षीच हे घर बांधले आहे. दरम्यान, केरीच्या उपसरपंचा सुलक्षा जल्मी यांनी भेट देऊन पाहणी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

पावसाळ्यातील आरोग्य

Mrityu Panchak 2026: काळजाचा थरकाप उडवणारे 5 दिवस! मृत्यू पंचकाचा थरार; 5 राशींवर घोंगावणारं मोठं संकट

Goa Crime: स्क्रॅप यार्ड्सवर पोलिसांची धडक कारवाई! 172 जणांची कसून तपासणी

Team India T20 Captaincy: ‘अशाप्रकारे सूर्याला कर्णधारपदावरुन हटवणे चुकीचे’, बीसीसीआयच्या संभाव्य निर्णयावर पूर्व सिलेक्टर नाराज; काय म्हणाले नेमके?

Goa Sports: शालेय क्रिकेट स्पर्धेत 'जीसीए'ची दमछाक! राज्यस्तरीय अंतिम लढती प्रलंबित

SCROLL FOR NEXT