South Goa District Administration Dainik Gomantak
गोवा

CM प्रमोद सावंत यांनी शब्द पाळला, मडगावच्या निवृत्त होमगार्ड महिलेला दोन लाखांची मदत सुपूर्द

Marago House Collapse Case: शिरोडकर यांना दोन लाखांची तत्‍काळ मदत दिली जाईल असे मुख्‍यमंत्री सावंत यांनी विधानसभेत जाहीर केले होते

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: पावसामुळे घर कोसळलेल्‍या माजी होमगार्ड विमल शिरोडकर यांना आज दक्षिण गोवा जिल्‍हा प्रशासनाकडून मदत म्‍हणून दोन लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्‍यात आला. दक्षिण गोव्‍याचे अतिरिक्‍त जिल्‍हाधिकारी उदय प्रभुदेसाई यांनी स्‍थानिक आमदार दिगंबर कामत यांच्‍या उपस्‍थितीत हा धनादेश शिरोडकर यांच्‍याकडे सुपूर्द केला.

शिरोडकर यांना दोन लाखांची तत्‍काळ मदत दिली जाईल, असे यापूर्वी मुख्‍यमंत्री डॉ. प्रमाेद सावंत यांनी विधानसभेत जाहीर केले होते. त्‍यानुसार आज हा धनादेश देण्‍यात आला, अशी माहिती आमदार दिगंबर कामत यांनी दिली. शिरोडकर यांचे पक्‍के घर उभे करून देण्‍याचा प्रयत्‍न आहे, असे त्‍यांनी सांगितले. यावेळी सासष्टीचे मामलेदार प्रतापराव गावकर हेही उपस्‍थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

नोंदणी न केलेले होम स्टे, हॉटेल्सवर कारवाई अटळ! सरकारी महसूल बुडविणाऱ्यांची गय नाहीच, पर्यटनमंत्र्यांचा थेट इशारा

Horoscope 28 Saptember 2026: करिअरला मिळणार गती, वैवाहिक जीवनात गोडवा वाढणार! आज 'या' राशींच्या नक्षत्रात चमकणार यशाचा तारा

History: सदाशिवगड ताम्रपट अन् गोव्यातील कदंब

South Africa Bar Shooting: बारमध्ये एन्जॉय करत होते लोक, अचानक अंदाधुंद गोळीबार; 17 जणांचा मृत्यू, 15 जखमी VIDEO

कुणबी साडीवर दावा कुणाचा?

SCROLL FOR NEXT