Goa Food Dainik Gomantak
गोवा

Goa Food: स्थानिक हॉटेल्‍स आजपासून पूर्ववत

परप्रांतीय हॉटेलवाल्यांमुळे लोकांची पोटपूजा झाली.

दैनिक गोमन्तक

मडगाव: सात दिवसांच्या गणपती विसर्जनानंतर (GanpatiVisarjan) व्यापारी राजधानीतील (Panajim) स्थानिक हॉटेल्‍स (Hotels) आता एकेक करून सुरू होऊ लागली आहेत. अनंत चतुर्दशी झाल्‍यामुळे सोमवारपासून ती पूर्ववत सुरू झाली. मात्र, या सुटीच्‍या काळात उडुपी व अन्य परप्रांतीय हॉटेलवाल्यांमुळे लोकांची पोटपूजा झाली.

स्थानिक हॉटेलवाले जरी मडगाव व परिसरातील असले तरी हॉटेलमधील कर्मचारी आपल्‍या गावी आठ ते दहा दिवस जातात. त्यामुळे मनात असूनही मालकांना हॉटेल सुरू करणे शक्य होत नव्हते. त्यामुळे येथील काही प्रमुख हॉटेल्‍स बंद होती. मात्र, ती सोमवारपासून सुरू होतील. साधारणत: 70च्या दशकांत त्यामुळे चतुर्थीनंतरच्या दिवसात मडगावात चहा मिळणे सुद्धा अवघड होते.

त्‍यानंतर एकेक करून ‘कामत’ व उडुपीवाल्यांची हॉटेल्‍स सुरू झाली व लोकांची गैरसोय दूर झाली. आता तर स्थानिकांपेक्षा त्‍यांची संख्या अधिक झाली आहे. तसेच चहा फराळाचे ठेले जागोजागी उभे झाले आहेत. त्यामुळे चतुर्थीच्‍या दिवसांतच केवळ नव्हे तर अन्य उत्सव काळांतही समस्या निर्माण होत नाही. पूर्वी ही दहा बारा दिवसांची सुटी गृहीत धरून काही हॉटेल मालक नूतनीकरण व अन्य दुरुस्तीकाम उरकून घेत होते. कोविडमुळे टाळेबंदी आल्‍यानंतर हॉटेलचालक अद्यापही धास्‍तावलेले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT