Hotels in Goa Dainik Gomantak
गोवा

रशिया-युक्रेन युद्धामुळे गोव्यातील हॉटेल व्यावसायिक संकटात

चार्टर विमाने बंद झाल्याने गोव्यातील शॅक्स व्यावसायिकही हवालदिल

सुशांत कुंकळयेकर

मडगाव : रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरु झाल्यामुळे या दोन्ही देशातून पर्यटकांना घेऊन येणारी चार्टर्ड विमाने बंद झाली आहे. याचाच परिणाम म्हणजे पूर्व युरोप आणि मध्य आशियातून गोव्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या रोडावली. याचा थेट परिणाम गोव्यातील 4 हजारापेक्षा अधिक असलेल्या लहान आणि मध्यम हॉटेल्सवर होऊ लागला आहे. शॅक्स व्यवसायही त्यामुळे मंदित आला आहे. (Hotels in Goa News Updates)

कोविड महामारी नंतर गोव्यात येणाऱ्या चार्टर विमानांच्या संख्येत विलक्षण घट झाली असली तरी राशियातून दर 10 दिवसांच्या अंतराने एक चार्टर विमान येत होते. तेही आता बंद होण्याची भीती व्ययसायिकांना सतावीत आहे. गोव्यात कझाकिस्तान मधून बऱ्यापैकी चार्टर विमाने यायची. पण या मोसमात तीही आलेली नाहीत. आणि युद्धामुळे युक्रेनहून चार्टर विमाने गोव्यात येतील ही आशा ठेवणे मूर्खपणाचे ठरेल. अन्यथा प्रत्येक पर्यटन मोसमात या देशातून 50 ते 60 चार्टर विमाने गोव्यात येत असत.

रशियन पर्यटकांना गोव्यात (Goa) आणणाऱ्या काँकार्ड या टुअर्स कंपनीचे इस्माईल शेख म्हणाले, उद्या 3 मार्चला रशियामधून एक चार्टर विमान येत आहे मात्र त्यात पर्यटक बरेच कमी आहेत अशी माहिती त्यांनी दिली. गोव्यात जी लहान आणि मध्यम हॉटेल्स आहेत, ती बहुतांश या चार्टर पर्यटकांवरच चालत असतात. त्यामुळे त्यांच्या व्यवसायावर या परिस्थितीचा विपरीत परिणाम होणार, असेही ते पुढे म्हणाले.

टीटीजीएचे निलेश शहा म्हणाले, सध्या लग्न समारंभ आणि इतर इव्हेंट साजरे करण्यासाठी देशी पर्यटक मोठ्या प्रमाणात गोव्यात येत असल्यामुळे मोठ्या तारांकित हॉटेल्सच्या व्यवसायावर फारसा काही परिणाम झालेला नाही. मात्र लहान व मध्यम हॉटेल्सवर निश्चितच परिणाम झाला आहे. त्याच बरोबर या पर्यटकांवर अवलंबून असणाऱ्या गोव्यातील किनारपट्टी भागातील शॅक्स व्यावसायिकांवरही त्याचा परिणाम होऊ शकतो.

लहान आणि मध्यम हॉटेल्स (Hotel) मालक संघटनेचे अध्यक्ष सेराफिन कोता यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधला असता, आम्ही सध्या अगदी त्रासात पडलो आहोत, काही हॉटेल्समध्ये एकही पर्यटक नाही अशी परिस्थिती आहे. उत्तर गोव्यातील काही भागातील अपवाद वगळता इतर ठिकाणी शॅक्समध्येही शुकशुकाटच आहे, असे त्यांनी सांगितले. कोविडमधून जग सावरत असताना किमान यावेळी तरी आम्ही चांगला व्यवसाय करू अशी आमची अपेक्षा होती. आमचे तीन मोसम कोविडमुळे (Covid 19) थंड पडले आणि हा चौथा मोसम या युद्धाने वाया जातोय, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT