Accident Death In Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Accident Death: बोरी बगलमार्गावर भीषण अपघात; दुचाकीस्‍वार ठार

Goa Accident Death: फोंडा पोलिस स्‍थानकाच्‍या हद्दीत दोन ठिकाणी झालेल्या अपघातांत एकाचा मृत्‍यू झाला; तर तर दोघे जखमी झाले. जखमींना गोमेकॉत दाखल करण्‍यात आले आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Accident Death: फोंडा पोलिस स्‍थानकाच्‍या हद्दीत दोन ठिकाणी झालेल्या अपघातांत एकाचा मृत्‍यू झाला; तर तर दोघे जखमी झाले. जखमींना गोमेकॉत दाखल करण्‍यात आले आहे.फोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोरी बगलमार्गावर झालेल्या अपघातात आशिष पाटील (२३) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला.

त्याची दुचाकी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ‘हिताची’ मशिनवर आदळली. ही घटना काल रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. मृत दुचाकीस्वार हा बोरीहून बेतोडा येथे जात होता. बेतोडा-बोरी बायपास रुंदीकरणाचे काम सुरू आहे.

‘हिताची’ मशीन रस्त्याच्या बाजूला पार्क केले होते. दुचाकीस्वार रस्ता रुंदीकरणाच्या ठिकाणी पोहोचल्यावर रस्त्याच्या डाव्या बाजूला गेला आणि मशिनवर धडकला. गंभीर दुखापत झाल्‍याने त्‍याचा मृत्‍यू झाला.

ढवळी येथे दोन वाहनांमध्‍ये अपघात

दुसरा अपघात ढवळी येथे सरस्वती मंदिरासमोर रस्त्यावर झाला. इनोव्हा कार फोंड्याच्‍या दिशेने चालली होती; तर पिकअप मडगावकडून येत होती. सरस्वती मंदिरासमोर पोहोचताच समोरासमोर अपघात झाल्याने इनोव्हा कारमध्‍ये असलेले यश पालयेकर (१८, फोंडा) व सिद्धी नाईक (१९, कुडचडे) जखमी झाले. त्‍यांना उपचारांसाठी गोमेकॉत दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास फोंडा पोलिस करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Construction: बेकायदा बांधकामांची माहिती द्यायला टाळाटाळ? पंचायत सचिवांना 10 हजारांहून अधिक दंड! गोवा खंडपीठाचा कठोर इशारा

BJP Election Preparation: गोवा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची ताकदीनिशी तयारी; भारती पवार-शिवप्रकाशांच्या उपस्थितीत CM सावंत-दामू नाईकांच्या बैठका

खरी कुजबुज: प्रदेश काँग्रेस एकसंध राहणार?

Birch Club Case: 'बर्च' क्लबच्या बनावट NOC प्रकरणात लुथरा बंधूंच्या जामिनावर पुन्हा सुनावणी; 2300 पानी दोषारोपपत्रामुळे प्रकरण गंभीर

GFA Award: गोव्याच्या फुटबॉलमधील दोन दिग्गजांचा गौरव! शिवानंद साळगावकर, मॉरिसियो आफोन्सो यांना जीवनगौरव पुरस्कार

SCROLL FOR NEXT