Home in Mandrem Goa Dainik Gomantak
गोवा

गोव्यात असंही एक घर; जिथे जायला रस्ताच नाही

मांद्रे परिसरातील मर्डीवाडा येथे फिलिप्स डिकुन्हा यांना घरी जाण्यासाठी लाकडी पुलाचा आधार

आदित्य जोशी

पणजी : गोवा म्हटलं की आपल्यासमोर सुंदर समुद्रकिनारे, भव्यदिव्य प्राचीन मंदिरं, भले मोठे रस्ते असंच काहीसं चित्र उभं राहतं. यामुळेच गोव्याला पर्यटकांकडून पहिली पसंतीही मिळते. मात्र गोव्यात एक घर असंही आहे ज्याकडे जायला साधा रस्ताही नाही असं जर कुणी सांगितलं तर विश्वास बसेल?. मात्र हे खरं आहे. पेडणे तालुक्यातील मांद्रे भागात एक घर असं आहे ज्याकडे जाण्यासाठी लाकडी पुलाचा आधार घ्यावा लागतोय.

Home in Mandrem Goa

उत्तर गोव्यातील मांद्रे मतदारसंघातील मर्डीवाडा येथील एक कुटुंब आजही आपल्या घरापर्यंत पक्क्या रस्त्याची वाट पाहातंय. फिलिप्स डिकुन्हा यांच्या घराकडे जाण्यासाठी साधी वाटही नसल्यामुळे त्यांची आणि कुटुंबीयांची तारेवरची कसरत सुरु असते. घराकडून गावात जाण्यासाठी त्यांनी शेतात एक लाकडी पूल बांधला आहे. मात्र या पुलावरुन जातानाही त्यांना आपला जीव धोक्यात घालावा लागतोय.

मोरजी मर्डीवाडा येथील फिलिप्स यांनी घरापर्यंत जाण्यासाठी लाकडी पूल उभा करून आपल्या कुटुंबियांची सोय केली आहे. मात्र ना त्यांच्याघरी गाडी नेता येते, ना पक्का रस्ता त्यांना जाण्यासाठी उपलब्ध आहे. लाकडी पूलही छोटा आणि कमकुवत असल्यामुळे पुलावरुन ये-जा करताना डिकुन्हा कुटुंबीयांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय. एखाद्यावेळी घरातील कुणी आजारी पडलं तर त्यांना रुग्णालयात कसं नेणार हा प्रश्न नेहमी डिकुन्हा कुटुंबासमोर उभा राहतो. त्यामुळे सरकारने आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी आपल्याला पक्का रस्ता बनवून द्यावा अशी माफक अपेक्षा डिकुन्हा कुटुंबीय करताना दिसताहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT