Holi Celebration in Goa  Dainik Gomantak
गोवा

मुरगाव शिगमोत्सव समितीतर्फे गुलालोत्सव

श्री दामोदर चरणी गुलाल वाहिल्यानंतर गुलालोत्सव म्युझिक, बॅण्डबाजा, ऑर्केस्ट्राने वास्को शहरात मिरवणूक काढून साजरा करण्यात आला.

दैनिक गोमन्तक

वास्को: मुरगाव शिगमोत्सव समितीतर्फे गुलालोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. वास्कोत श्री दामोदर चरणी गुलाल वाहिल्यानंतर गुलालोत्सव म्युझिक, बॅण्डबाजा, ऑर्केस्ट्राने वास्को शहरात मिरवणूक काढून साजरा करण्यात आला. नागरिकांनी गाण्यांच्या तालावर ठेका धरला. प्रत्येक वाड्यावर लहान मुलांबरोबर महिलाही गुलालोत्सवात सहभागी झाल्या होत्या. ग्रामदैवत श्री दामोदर चरणी गुलाल वाहिल्यानंतर मुरगाव शिगमोत्सव समितीतर्फे धुळीवंदनाला सुरवात झाली.

वास्कोचे नवनिर्वाचित आमदार दाजी साळकर तसेच मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनीही धुलीवंदनात आपला सहभाग दर्शवला. त्यांच्या उपस्थितीत श्री दामोदर चरणी गुलाल अर्पण केला. यावेळी त्यांच्यासमवेत मुरगाव शिगमोत्सव नागरी समितीचे अध्यक्ष विजय नागवेकर, सरचिटणीस नितीन चोपडकर, सल्लागार मनेष आरोलकर, सचिव संतोष केरकर, उपाध्यक्ष सुदेश भोसले, प्रभाकर मुळीक, शेखर कळंगुटकर, खजिनदार रिमा सोनुर्लेकर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुरोहितांमार्फत श्रीचरणी गान्हाणे घातल्यानंतर धुलीवंदनाच्या कार्यक्रमाला सुरवात झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: "आम्ही भारतीय आहोत, आम्हाला चायनीज म्हणू नका!" अरुणाचलच्या चिमुकलीचा व्हिडिओ पाहून पाणावले देशवासीयांचे डोळे

Goa Parra Road: 'डियर जिंदगी रोड'वर पर्यटनाची नवी लाट! आलिया-शाहरुखच्या सायकलिंग दृश्याने पर्रा-माडानी रस्‍त्‍याला देशभरात ओळख

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बुध, गुरु आणि मंगळाची महायुती! 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठा ट्विस्ट; हाती लागणार कुबेराचा खजिना

Chief Election Commissioner: मुख्य निवडणूक आयुक्त येणार गोव्यात, 2 व 3 सप्टेंबरला दौरा; निवडणुकीच्या दृष्टीने अधिकाऱ्यांना करणार मार्गदर्शन

न्यू यॉर्कच्या सिप्रियानी वॉल स्ट्रीटवर भारतीय संस्कृतीचा डंका! 'भारत बियॉन्ड बॉर्डर 2.0' गाला संपन्न; सिनेकलाकारांची विशेष उपस्थिती

SCROLL FOR NEXT