Goa News |History Exhibition Dainik Gomantak
गोवा

Goa News: संस्‍कृती जतन करून पुढच्या पिढीकडे सोपवा

पर्ये विद्यालयात हडप्पा संस्कृती प्रदर्शनाचे उद्‌घाटन करण्यात आले.

दैनिक गोमन्तक

Goa News: आपल्‍या पूर्वजांनी खुंटी मारून मठी उभी केलेल्या संस्कृतीला आजच्या पिढीने जपले पाहिजे. संस्कृती जतन करून पुढच्या पिढीला तिची ओळख करून द्यायला पाहिजे, असे उद्‌गार पर्ये विद्यालयाच्‍या इतिहास शिक्षिका ममता ऊर्फ सना गावस यांनी काढले. येथील श्री हनुमान माध्यमिक विद्यालयात आयोजित इतिहास प्रदर्शनात त्‍या सन्माननीय अतिथी म्‍हणून बोलत होत्‍या.

यावेळी प्रमुख पाहुणे म्‍हणून इतिहास शिक्षक विश्वास काळेकर प्रमुख अतिथी म्‍हणून उपस्‍थित होते. तसेच पालक-शिक्षक संघाचे अध्यक्ष संतोष गावकर, प्रा. रियाझ जमादार, ज्येष्ठ शिक्षक रामदाम नाईक, स्नेहप्रभा वेलिंगकर, रतिब गावस यांची उपस्थिती होती.

काळेकर यांनी हडप्पा संस्कृतीचा उदय आणि पतनाचा काळ कथन केला. तर, विद्यार्थ्यांना एक व्यासपीठ मिळावे, त्यांना प्रोत्साहन मिळावे, हडप्पा संस्कृतीची ओळख व्हावी हा हेतू समोर ठेवून इतिहास शिक्षिका दिशिता एन. यांनी माती, लाकूड, भण्याद्वारे हडप्पा संस्कृतीचे लोकजीवन उभे केले.

मान्यवरांच्या हस्ते हडप्पा संस्कृती प्रदर्शनाचे उद्‌घाटन करण्यात आले. दर्शना पिंगळे यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. आयनन जनवार यांनी आभार मानले.

विद्यार्थ्यांकडून मिळाला उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद

इतिहास प्रदर्शनाला विद्यार्थ्यांकडून उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद मिळाला. सत्तरी तालक्‍यातील विविध विद्यालयांच्‍या विद्यार्थ्यांनी तसेच शिक्षकांनी प्रदर्शनाला भेट देऊन इतिहास व माहिती जाणून घेतली.

त्‍यात सरकारी माध्यमिक विद्यालय शेळप, सरकारी माध्यमिक विद्यालय वाळपई, श्री हनुमान विद्यालय वाळपई व सरकारी माध्यमिक विद्यालयाचा समावेश होता. या कार्यक्रमास शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्‍थही मोठ्या संख्‍येने उपस्‍थित होते. सूत्रसंचालन दीक्षिता गावस यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SIR Guidelines: 'एसआयआर'च्या मार्गदर्शक तत्त्वांना सुप्रीम कोर्टाची कायदेशीर मान्यता? निवडणूक आयोगाच्या वकिलांचा दावा; गोवा खंडपीठात आजही सुनावणी सुरु

Gaza Revenge Plot Exposed: गाझाचा बदला घेण्यासाठी रचला कट, फ्लाईदुबईच्या को-पायलटचा धक्कादायक खुलासा, म्हणाला, 'मला शहीद व्हायचे होते'

SCROLL FOR NEXT