First IVF Baby Born In Goa Dainik Gomantak
गोवा

First IVF Baby Born In Goa: ऐतिहासिक! गोव्यात पहिल्या 'आयव्हीएफ' बाळाने गोमेकॉत घेतला जन्म

IVF Baby Born In GMC Goa: राज्यातील दाम्पत्यांना मोफत आयव्हिएफ सुविधा दिली जाते, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी यावेळी दिली.

Pramod Yadav

First IVF Baby Born In Goa

बांबोळी: गोव्याच्या सरकारी आरोग्य क्षेत्रात मोठे यश मिळवले आहे. आयव्हीएफ या आधुनिक तंत्राच्या वापरातून पहिल्या वहिल्या बाळाने गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात जन्म घेतला आहे. या घटनेचा उल्लेख राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी ऐतिहासिक असा केला आहे.

आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी या घटनेची माहिती एक्सवरुन दिली आहे. गोमेकॉत पहिले वहिले आयव्हिएफ बाळ जन्माला आले आहे. गोमेकॉने मैलाचा दगड पार केलाय. सिझेरियन पद्धतीचा वापर करुन स्त्री जातीच्या बाळाला जन्म दिला, अशी माहिती राणे यांनी दिलीय. गोव्याने राज्यातील दाम्पत्यांसाठी मोफत आयव्हीएफ सुविधा सुरु केलीय.

'गोव्यातील प्रत्येक कुटुंबाला आधुनिक आरोग्य सुविधा देण्याचे आमचे वचन आहे. राज्यातील दाम्पत्यांना मोफत आयव्हिएफ सुविधा दिली जाते', अशी माहिती आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी यावेळी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Record: 22 षटकार, 17 चौकार… टी20 क्रिकेटमध्ये ठोकलं 'द्विशतक', 140 किलो वजनाच्या खेळाडूनं घातला धुमाकूळ; गोलंदाजांच्या उडवल्या चिंधड्या

Strait of Hormuz: इराणचा अमेरिकेला 'डिजिटल' दणका! होर्मुजच्या सामुद्रधुनीतील इंटरनेट केबल्सवर नियंत्रण मिळवण्याची तयारी; जागतिक दळणवळण धोक्यात

Shani Gochar 2026: शनीदेवाचा रेवती नक्षत्रात धमाका! 2 जुलैपासून 'या' 3 राशींना लागणार लॉटरी; उत्पन्नात होणार मोठी वाढ

पेडण्यात सिंधुदुर्गची ताजी मासळी, रखडलेल्या प्रकल्पामुळे सुविधांचा अभाव; ग्राहकांचा नाईलाज

Goa Assembly Election 2027: गोव्यात आगामी सरकार काँग्रेसचेच! अमित पाटकरांनी व्यक्त केला विश्वास; केरळ, तमिळनाडू विजयाबद्दल काँग्रेसकडून जल्लोष

SCROLL FOR NEXT