Haath Kaatro Khamb, Old Goa Dainik Gomantak
गोवा

UNESCO Heritage Goa:'पूर्वजांनी धर्म रक्षणासाठी बलिदान दिले, हात कातरो खांबाचा युनेस्कोच्या सूचीत उल्लेख व्हावा'; हिंदू जनजागृती समिती

Haath Kaatro Khamb, Old Goa: जुने गोवा येथील हात कातरो खांबाला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा द्या ! - गोवा मुक्ती दिनाच्या निमित्ताने शासनाकडे मागणी

Pramod Yadav

Goa Religious History: "खरा इतिहास आपल्याला शिकवला जात नाही, म्हणून हात कातरो खांबाचे महत्त्व आपणास माहित नाही. आपण आपल्या पूर्वजांच्या बलिदानाच्या इतिहासाचा अभिमान ठेवला पाहिजे. आपल्या पूर्वजांनी धर्माच्या रक्षण्यासाठी येथे बलिदान दिलेले आहे आणि ही आपली अस्मिता आहे. युनेस्कोच्या सूचीमध्ये हात कातरो खांबाचा उल्लेख झाला पाहिजे," अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने केली आहे.

हात कातरो खांब ऐतिहासिक स्मारक दुर्लक्षित असून त्या ठिकाणी अतिशय घाण केली जाते. हे ऐतिहासिक स्मारक असल्याने याचे पावित्र्य जपलं पाहिजे. हात कातरो खांबाला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा द्यावा, अशी मागणी समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी सरकारकडे केली आहे.

समितीने गोवा क्रांतीदिनाच्या निमित्ताने जुने गोवे येथील ऐतिहासिक ‘हात कातरो’ खांबाच्या ठिकाणी गोवा मुक्ती लढ्यातील ज्ञातअज्ञात हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली. गोमंतक मंदिर महासंघाचे जयेश थळी, ब्राह्मण महासंघाचे राज शर्मा, ब्रह्मकुमारी नूतन प्रमोद नानोस्कर, आलोयासिस विद्यालयाचे मुख्याध्यापक आनंद फडते, सत्यवान म्हामल आदी उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

कोमुनिदादींच्या जमिनीवरील बेकायदा घरे कायदेशीर करण्याच्या विधेयकाला विरोध; २४ ऑगस्टला खास बैठक

Viral Video: अतिथी देवो भव… पण पाहुण्याची अशी बेइज्जती, व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल थक्क; नेटकऱ्यांनी घेतली मजा!

मुस्लिम राष्ट्रासाठी पाकिस्तानात हिंदू, ख्रिश्चन लोकांवर अत्याचार करण्यात आले; मुख्यमंत्री प्रमोद सावंत

IND vs PAK: ‘इतकी धुलाई करतील की...' पाकिस्तानी दिग्गजाला भारतीय बॅटर्स धास्ती; आशिया कपमधील भारत-पाक सामन्यावर मोठं वक्तव्य

Janmashtami 2025: फक्त 43 मिनिटांचा शुभकाळ, मग कधी आणि कशी कराल गोकुळाष्टमीची पूजा?

SCROLL FOR NEXT