Himachal Pradesh Rape Accused arrested in Margao Goa  Dainik Gomantak
गोवा

बलात्कार करून गोव्यात पळून आलेल्या हिमाचल प्रदेशच्या आरोपीला मडगावात अटक

Himachal Pradesh Rape Case : दीपक पेयांग या 27 वर्षीय आरोपीला मडगाव पोलिसांनी अटक करून हिमाचल प्रदेश पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

सुशांत कुंकळयेकर

मडगाव : हिमाचल प्रदेशमध्ये एका 12 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून आरोपी गोव्यात पळून आला होता. याबाबत माहिती मिळताच, दीपक पेयांग या 27 वर्षीय आरोपीला मडगाव पोलिसांनी अटक करून हिमाचल प्रदेश पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. (Himachal Pradesh Rape Accused arrested in Margao Goa)

सदर आरोपी हिमाचल प्रदेशमध्ये पोलिसांच्या रडारवर होता. पोलिसांना चुकवत तो विविध राज्यात फिरत होता. काही महिन्यांपूर्वी तो गोव्यात आला होता. मांडप नावेली येथे तो एका भाड्याच्या खोलीत राहात होता. मडगावात एका गॅस एजन्सीकडे तो लोडर म्हणून काम करत होता, अशी माहिती मडगावचे पोलीस निरीक्षक सचिन नार्वेकर यांनी दिली आहे.

दरम्यान, कोलवा पोलीस स्थानकाच्या हद्दीत एका 11 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग आणि बलात्कार केल्याने पोलिसांनी धर्मेंद्र यादव या 28 वर्षीय युवकाला अटक केली आहे.

संशयित यादव हा मूळ उत्तर प्रदेश येथील असून गोव्यात तो एका खासगी कंपनीत काम करत होता. पीडित मुलगी त्याच्या शेजारीच राहत होती. त्याने तिच्याकडे दोस्तीचे संबंध वाढवून तिच्यावर ही बळजबरी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

POP Ganesh Idol: गोव्यात प्लास्टर ऑफ पॅरिस गणेशमूर्तींच्या विक्रीवर कठोर बंदी घाला; हिंदू जनजागृती समितीची मागणी

Jitesh Sharma: लॉर्ड्समध्ये जितेश शर्माची 'फजिती'! 'या' खेळाडूमुळे मिळाली एन्ट्री, पाहा VIDEO!

Comunidade Land Goa: कोमुनिदादींच्या जमिनी केवळ गावकार व भागधारकांच्याच; हस्तक्षेप करण्याचा राज्य सरकारला अधिकार नाही

Viral Video: जगाला वेड लावणारा 'ऑरा फार्मर'! 11 वर्षांचं पोर बनलं सोशल मीडियावर स्टार; त्याचा अनोखा डान्स तुम्ही पाहिला का?

Nagpur Goa Highway: गोव्यात नेमके कोणते शक्तिपीठ? महामार्ग विरोधात रक्ताच्या अखेरच्या थेंबापर्यंत लढण्याचा राजू शेट्टींचा निर्धार

SCROLL FOR NEXT