Fire At Navewade Vasco Dainik Gomantak
गोवा

Fire in Navewade Vasco: नवेवाडे वास्को येथे डोंगराळ भागात आग, अग्निशमन दलाच्या प्रयत्नामुळे मोठा अनर्थ टळला

या डोंगराळ भागात दाट लोकवस्ती असून सदर प्रकार लोकांच्या लक्षात येताच त्यांनी वास्को अग्निशमन दलाला याविषयी माहिती दिली.

गोमन्तक डिजिटल टीम

Fire in Navewade Vasco: नवेवाडे वास्को येथे डोंगराळ भागात झाडीला अज्ञातांनी लावलेल्या आगीत एक माडाचा वरचा भाग जळून खाक झाला.

वास्को अग्निशमन दलाने घटनास्थळी येऊन आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला.

आज संध्याकाळी 7.30 च्या दरम्यान नवेवाडे येथे मारुती मंदिराजवळ दाट लोकवस्ती जवळ असलेल्या डोंगराळ भागांत झाडीला अज्ञातांनी आग लावली असता सदर आगीने भयंकर पेट घेतला.

आग मोठी असल्याने आगीचे लोळ हवेत दूरवर जात होते तसेच, धुराचे देखील मोठे लोळ निर्माण झाले.

या डोंगराळ भागात दाट लोकवस्ती असून सदर प्रकार लोकांच्या लक्षात येताच त्यांनी वास्को अग्निशमन दलाला याविषयी माहिती दिली.

अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी येऊन सदर आग मोठ्या परीश्रमाने आटोक्यात आणली.

मात्र येथे असलेल्या एका माडाच्या वरच्या भागाने पेट घेतला. यात माडाचा वरचा भाग जळून खाक झाला. आग माडाच्या वरच्या भागाला कशी लागली याची माहिती स्थानिकांना देखील समजली नाही.

दाट लोकवस्ती असल्याने लोक भयभीत झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग वेळीच आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला. या डोंगर पायथ्यांशी रेल्वे ट्रॅक असून खाली रेल्वे दुपदरी करणाचे काम चालू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबुज: गणपती कोणाला पावणार?

Iran Missile Attack: अमेरिकन सैनिकांवरील हल्ल्यात चीनचा हात? गुप्तचर सॅटेलाईट फोटोंचा नवा खुलासा, ट्रम्प सरकारची वाढली डोकेदुखी

Goa Water Conservation: गोव्यात पाण्याची मोठी चिंता! 30 सप्टेंबरपर्यंत 500 बंधाऱ्यांचे दरवाजे बंद करण्याचा सरकारचा निर्णय; जलसंवर्धनासाठी उचलली पावले

Ganeshotsav 2026: गोव्यात गणेशोत्सवाचा जल्लोष सुरू! अंगणात सडा, दाराशी रांगोळी अन् माटोळीची सजावट; बाप्पाच्या आगमनाने चैतन्याला उधाण

Horoscope 14 September 2026: गणपती बाप्पा मोरया...! बाप्पाच्या कृपावर्षावानं 'या' राशी होणार मालामाल; कुबेराचा खजिना उघडणार

SCROLL FOR NEXT