High Court of Bombay at Goa Dainik Gomantak
गोवा

Goa: शिक्षा रद्द! ताडीच्या मडक्याला अल्पवयीन विद्यार्थ्याचा पाय लागल्याने केली होती मारहाण

विद्यार्थ्याच्या शर्टच्या कॉलरला धरण्यामागील हेतू त्याला इजा करण्यासाठी नव्हे तर त्या विद्यार्थ्याने केलेली चूक सुधारण्यासाठी होता, असे निरीक्षण गोवा खंडपीठाने नोंदवले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

ताडीच्या मडक्याला अल्पवयीन विद्यार्थ्याचा पाय लागल्याने मारहाण केल्याची घटना समोर आली होती. यात रेंदेर सुभाष पावस्कर याला बाल न्यायालयाने दिलेली कैद व दंडाची शिक्षा सुनावली होती.

दरम्यान, विद्यार्थ्याच्या शर्टच्या कॉलरला धरण्यामागील हेतू त्याला इजा करण्यासाठी नव्हे तर त्या विद्यार्थ्याने केलेली चूक सुधारण्यासाठी होता, असे निरीक्षण गोवा खंडपीठाने नोंदवले असून, रेंदेर सुभाष पावस्कर याची शिक्षा गोवा खंडपीठाने रद्द केली आहे.

बाल न्यायालयाने सुभाष पावस्कर याला भादंसंच्या कलम 323 व गोवा बाल कायदा कलम 8(02) खाली दोषी ठरवून त्याला कैदेची तसेच दंडात्मक शिक्षा सुनावली होती. या शिक्षेला पावस्कर यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

पावस्कर हा ताडी काढत असताना जमिनीवर असलेल्या एका मडक्याला विद्यार्थी चालत जात असताना त्याला पाय लागला त्यामुळे हे मडके पडले मात्र फुटले नाही. त्यामुळे यापूर्वी फुटलेली मडके ही त्यानेच फोडली असावीत असा अर्थ काढून संतप्त झालेल्या पावस्कर याने त्या विद्यार्थ्याच्या शर्टच्या कॉलरला पकडले व रागाच्या भरात त्याने त्याला कानफडीत देऊन शिक्षिकांकडे स्वाधीन केले.

विद्यार्थ्याला इजा करण्याचा त्याचा कोणताच हेतू नव्हता. त्यामुळे उच्च न्यायालयाने या निवाड्यात हस्तक्षेप करून तो रद्द करण्याची गरज आहे अशी बाजू त्याचे वकील अरुण ब्राझ डिसा यांनी मांडली होती.

दरम्यान, मुलाला मारहाण केल्याचे सिद्ध होत असल्याने त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे असा युक्तिवाद सरकारी वकील गौरीश नागवेकर यांनी केला होता.

विद्यार्थ्याचा पाय लागून मडके पडल्याने त्याला राग येणे शक्य आहे कारण या मडक्यात ताडी काढून आपला उदारनिर्वाह करतो. रागाच्या भरात विद्यार्थ्याची चूक सुधारण्यासाठी त्याने ती कृती केली. असे निरक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने सुभाष पावस्करची शिक्षा रद्द केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa ITI Fire Safety Course: 10वी पास तरुणांसाठी सरकारी रोजगाराची सुवर्णसंधी! म्हापसा 'ITI'मध्ये 24 जागांसाठी प्रवेश, एक वर्षाचा अभ्यासक्रम

Goa Murder Case: दोरीने गळा आवळला, पण मारेकरी कोण? गोव्यात गाजलेल्या 'अनमोड घाट' हत्येचा शेवट; चौघांची निर्दोष सुटका

PM Jan Dhan Yojana Goa: 2,35,200 नागरिकांपर्यंत पोहोचल्या बँकिंग सुविधा! जनधन योजनेत गोव्यातील 'कॅनरा बँक' अव्वल; केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिली आकडेवारी

Shukra Gochar: धन अन् ऐश्वर्याचा कारक शुक्र बदलणार चाल! 4 राशींचे सुखाचे दिवस संपून आव्हानांचा काळ सुरु; आर्थिक बजेट बिघडणार

Goa Water Metro Project: पर्यावरणपूरक बोटी अन् सुरक्षित जलप्रवास! CM सावंत यांच्या 'गोवा वॉटर मेट्रो' प्रस्तावाला केंद्र सरकारची मंजुरी

SCROLL FOR NEXT