Stone carving Dainik Gomantak
गोवा

Goa Government : अवैध चिरेखाणीवरून राज्य सरकार धारेवर

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Government : बरकटे मोले येथील सर्वे क्रमांक 33/1 मधील अवैध चिरेखाणीची दखल न घेतल्याने बुधवारी गोवा खंडपीठाने राज्य सरकारला धारेवर धरले. त्यावेळी खाण खात्याचे संचालक तसेच कुळे पोलिस स्थानकाचे प्रमुख कोण होते? त्यांनी कारवाई का केली नाही? असा सवाल करत सविस्तर अहवाल पुढील सुनावणीवेळी सादर करण्याचे निर्देश खंडपीठाने खाण सचिवांना दिले.

मुख्य सचिवांनी या प्रकरणात व्यक्तिशः निगराणी करण्याचे व खाण सचिवांनी प्राधान्यक्रमाने चौकशी करण्याच्या सूचना करताना सादर केलेल्या अहवालाबाबत असमाधान व्यक्त केले. गोवा खंडपीठाने मागील सुनावणीवेळी या बेकायदा चिरेखाणीसंदर्भात आतापर्यंत केलेल्या चौकशीचा तसेच तपासकामाचा अहवाल सादर करण्यास सांगितले होते.

त्यानुसार गोवा पोलिस महासंचालक तसेच खाण संचालकांनी वेगवेगळ्या प्रतिज्ञापत्रे सादर करून माहिती दिली. त्यांनी दिलेल्या माहितीबाबत गोवा खंडपीठाने असमाधान व्यक्त करत दिलेल्या माहितीमध्ये जबाबदार असलेल्या व्यक्तींविरुद्ध कोणतीच कारवाई केल्याचे उल्लेख नाही. ही चिरेखाणी गेल्या 4-5 वर्षापासून सुरू असून सुमारे 1.4 कोटींचा महसूल बुडविला गेला, तरीही सरकार गंभीर नसल्याबाबत आश्‍चर्य व्यक्त केले. ॲडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी पोलिस व खाण खात्यातर्फे उत्तर सादर केले. त्यांनी बरकटे-मोले बेकायदा चिरेखाणीप्रकरणी संशयित गोविंद गावकर याला पोलिसांनी अटक केल्याचे सांगितले.

चौकशीसाठी ‘एसआयटी’ची गरज

खाण खात्याने बरकटे-मोले व्यतिरिक्त इतर ठिकाणी अवैध चिरेखाणीचे प्रकार घडले आहेत, असे नमूद केले. त्यावर गोवा खंडपीठाने तपासासाठी विशेष तपास पथक स्थापन करण्याची गरज व्यक्त केली. किती बेकायदा व अनधिकृत चिरेखाणीमधून चिरे उत्खनन करण्यात आले, याची सविस्तर माहिती सादर करण्याचे निर्देश दिले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT