Heavy traffic restricted running through Chorla Ghat Dainik Gomantak
गोवा

साखळी ते चोर्ला घाट मार्ग 4 ते 11 मे अवजड वाहतुकीसाठी बंद राहणार

दुरुस्ती आणि हॉटमिक्सिंगच्या कामासाठी मार्ग बंद, अवजड वाहतूक अनमोडमार्गे वळवली जाणार

दैनिक गोमन्तक

पणजी : दत्तवाडी-साखळी ते चोर्ला घाट गोव्याच्या हद्दीपर्यंत रस्त्याची दुरुस्ती केली जाणार आहे. दुरुस्ती आणि हॉटमिक्सिंगच्या कामासाठी हा मार्ग 4 मे ते 11 मे या कालावधीत अवजड वाहनांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत गोव्यातून चोर्लामार्गे कर्नाटकमध्ये जाणारी सर्व अवजड वाहने अनमोड घाटामार्गे वळवण्यात येणार आहेत.

गोवा-बेळगाव दरम्यानचा चोर्ला घाट 4 ते 11 मे दरम्यान अवजड वाहनांसाठी बंद करण्यात येणार आहे. या दरम्यानच्या काळात रस्ता दुरुस्ती आणि रस्त्याच्या लेव्हलिंगचे काम सुरू असणार आहे. यासाठी या दुरुस्ती दरम्यानची अवजड वाहनांची वाहतूक अनमोड घाटरस्ता मार्गे वळवण्यात आली आहे. याची संबंधित प्रवाशांनी आणि नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम खात्याने केले आहे.

दरम्यान साखळी-केरी-चोर्ला घाट दरम्यान रस्त्याच्या निकृष्ट कामाचा अनुभव घेतल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आक्रमक झाले आहेत. त्यांनी या कामाच्या चौकशीचे आदेश दिले असून या संपूर्ण कामाची त्रयस्थ तज्ज्ञांकडून तपासणी करून याचा खर्च संबंधित कंत्राटदाराकडून वसूल करावा. तसेच ही चौकशी होईपर्यंत हे काम पाहणारे सार्वजनिक बांधकाम खात्याचे कनिष्ठ अभियंते आणि साहाय्यक अभियंते यांना तत्काळ निलंबित केले आहे. आता या रस्त्याचं काम प्राधान्याने केलं जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT