Goa Rain Update Dainik Gomantak
गोवा

Goa Rain Update : राज्‍यात गडगडाटासह पाऊस; उकाड्यापासून थोडा दिलासा

मच्‍छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये असा इशारा

दैनिक गोमन्तक डिजिटल

राजधानी पणजीसह राज्‍याच्‍या इतर भागात सोमवारी रात्री पावसाच्‍या जोरदार सरी कोसळल्‍या. ग्रामीण भागात तर विजांचा लखलखाट आणि ढगांच्‍या गडगडाटासह पाऊस पडला. त्‍यामुळे वीजही ‘गुल’ झाली. परिणामी बहुतांश भागात काळोख पसरला होता. डिचोली, साखळी, वाळपई, कुळे, काणकोण, सांगे, फोंडा, सावर्डे येथे रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरूच होता.

गेल्या अनेक दिवसांपासून उकाड्याने लोक हैराण झाले होते. त्यात कालपासूनच ढगाळ वातावरण होते. आज उष्णता आणखी वाढली होती. सर्वजण चातकासारखी पावसाची वाट पाहत होते.

आजही शक्‍यता

राज्यात मंगळवार दि. 23 मे रोजी काही ठिकाणी हलका तर काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्‍यक्त केली आहे. वारेही जोरदार वाहणार असून, मच्‍छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये असा इशारा देण्‍यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT