Heavy rains in the next 3-4 hours in Goa Dainik Gomantak
गोवा

राज्यात पुढील 3-4 तासांत पावसाची जोरदार हजेरी; हवामान खात्याचा अंदाज

सुमारे 40 किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांसोबत पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे

दैनिक गोमन्तक

गोवा: राज्यात गेल्या काही दिवसांपासुन मान्सुन सक्रिय झाला आहे. गोवा हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज पुढील 3-4 तासांत उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा जिल्ह्यांत काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यात विजांच्या कडकडाटासह; सुमारे 40 किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांसोबत पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे.

(Heavy rains in the next 3-4 hours in state; Goa IMD forecast)

संगे, केपे या तालुक्यांवर पावसाचे ढग आले आहेत. तर तिसवाडी, मुरगाव, सासष्टी आदी तालुक्यांकडेही पावसाचे ढग येत आहेत.

गोव्यातील (Goa) पावसाबाबत यलो अलर्ट

रविवारी गोव्यातील अनेक भागांमध्ये पाऊस झाला. सोमवारीही येथे पावसाचे पावसाचे वातावरण दिसुन आले होते. सोमवारीही राज्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस पडू शकतो असे हवामान खात्याने वर्तवले होते. IMD ने काही भागांबाबत यलो अलर्ट जारी केला आहे. अहवालानुसार, गोव्यात आज 64.4 मिमी ते 115.5 मिमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. शनिवारी येथे 116.2 मिमी पाऊस झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT