Vasco Dainik Gomantak
गोवा

मुसळधार पावसामुळे वास्कोतील जनजीवन झाले विस्कळीत

वास्कोत (Vasco) दुपारी पडलेल्या पावसामुळे (Rain) जनजीवन विस्कळीत झाले. अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेलेले पाहण्यात आले.

दैनिक गोमन्तक

वास्को: वास्कोत (Vasco) दुपारी पडलेल्या पावसामुळे (Rain) जनजीवन विस्कळीत झाले. अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेलेले पाहण्यात आले. मुरगाव पालिका इमारतीत पालिका कार्यालयात पाणीच पाणी झाल्याने कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली. संध्याकाळी पाच नंतर पावसाने उसंत घेतल्याने परीस्थिती पुर्वपदावर आली.

काल रात्रीपासून मुसळधार पावसाने वास्को शहराला झोडपून काढले. नंतर आज पहाटेपासून थोडी उसंत घेतली.नंतर दुपारी बाराच्या नंतर पावसाने पुन्हा हजेरी लावली. यात जनजीवन विस्कळीत झाले तसेच दुपारी कार्यालयीन कर्मचाऱ्यांची पावसामुळे बरीच तारांबळ उडाली.दुपारी लंच ब्रेकला जे घरी जात होते ते पावसामुळे अडकून पडले. तसेच बाजारात आलेल्या लोकांचीही तारांबळ उडाली. पाऊस थांबण्याचे नाव घेत नसल्याने काहींनी भिजत घर गाठले.

दरम्यान येथील मुरगाव नगरपालिकेत पावसामुळे कार्यालयात पाण्याची गळती लागली व सगळीकडे पाणीच पाणी झाले. यात दस्तावेज भिजून गेले. आपल्या वैयक्तिक कामासाठी आलेल्या लोकांची कामे यामुळे अडून पडली.कर्मचाऱ्यांची यावेळी धांदल उडाली. कार्यालयात झालेले पाणी काढताना कर्मचारी दिसत होते. दरम्यान सध्या पालिका नुतनीकरण करण्याचे काम चालू असून पालिकेने आपले बस्तान हलवले नसल्याने इमारतीच्या नुतनीकरण करण्याच्या कामाला अडथळा निर्माण झाला आहे. पालिका कार्यालय कधी खाली होणार आणि काम चालू करणार याची वाट संबंधित कंत्राटदार बघत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT