Vegetables Dainik Gomantak
गोवा

Goa Vegetables: महागाईचा भडका! मान्सूनोत्तर पावसामुळे कांदा, टोमॅटो महागला

Goa Vegetable Rates: राज्यात मागील दोन-तीन महिन्यांपासून भाजीपाल्याच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. शेजारील बेळगाव, हुबळी, कोल्हापूर परिसरात मॉन्सूनोत्तर पावसामुळे कांदा, टोमॅटो, भाजी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Post-Monsoon Damage in Belgaum, Hubli, and Kolhapur Drives Up Vegetable Prices In Goa

पणजी: राज्यात मागील दोन-तीन महिन्यांपासून भाजीपाल्याच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. शेजारील बेळगाव, हुबळी, कोल्हापूर परिसरात मॉन्सूनोत्तर पावसामुळे कांदा, टोमॅटो, भाजी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे भाजीपाल्याची आवक कमी झाल्याने बाजारात सर्व प्रकारचा भाजीपाला महागला आहे.

शेतमळ्यात पाणी साचल्याने भाजीचे पिक नष्ट झाले. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कांदा, टोमॅटो आणि बटाट्याच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून टोमॅटो, कांद्याचे दर अजूनही भडकलेलेच असल्याने या महागाईच्या भडक्यात सर्वसामान्य जनता भरडली जात आहे.

पणजी बाजारात टोमॅटो काही ठिकाणी ६० रुपये तर काही ठिकाणी ८० रुपये प्रती किलो दराने विकला जात आहे. त्या सोबतच जुना कांदा ८० रुपये व नवा कांदा ६० रुपये प्रती किलो दराने विकला जात आहे. बिन्स १५० रुपये किलो दराने विकले जात असून आले २०० रुपये किलो तर लसूण ४०० रुपये किलो दराने विकला जात आहे.

लसूण ६०० रुपयांपर्यंत विकला जात आहे.पालेभाज्या तसेच फळभाज्यांच्या किमतीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. उत्तम आरोग्यासाठी फळे देखील खरेदी करणे मध्यमवर्गीयांना आता परवड नाहीत. बाजारात स्थानिक पालेभाज्यांची आवक कमी झाली असून आंबाडे, भाजीची केळी, काटेकणगी, करांदे मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत. त्यांना चांगली मागणी आहे.

राज्यात पावसाळ्यानंतर अळू माडी काढण्यात येते. या अळू माडीला मोठ्या प्रमाणात बाजारात मागणी असते. आता ही अळू माडी बाजारात दाखल झाली असून तिला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मध्यम आकाराची एक माडी १०० ते १५० रुपयांना विकली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

Lucky Zodiac Signs: आर्थिक प्रगती आणि सुख-समृद्धीचे नवे योग! ऑक्टोबर महिन्यात 'हे' मोठे ग्रह बदलणार 4 राशींचे भविष्य, मिळणार बक्कळ पैसा

Son Appeal Rejected: वडिलांच्या मृत्युपत्राला आव्हान देणाऱ्या मुलाचे अपील फेटाळले; स्वतःच्या हिश्शाची जमीन मुलीला देण्याचा अधिकार कायम

KBC 18: पणजीतील 'पहिली चाहती' आजही संपर्कात; अमिताभ बच्चन यांच्या आठवणींनी रंगला 'केबीसी', अजित पुनियांनी जिंकले 12.5 लाख

SCROLL FOR NEXT