पावसाने घराची भिंत कोसळली Dainik Gomantak
गोवा

Goa: मुसळधार पावसात डिचोलीतील घरांची पडझड

पावसाने (Heavy Rain) कहर केला असून डिचोली तालुक्यात (Bicholim) सर्वत्र मुसळधार पर्जन्यवृष्टी चालूच आहे.

दैनिक गोमन्तक

डिचोली: मंगळवारी पडलेल्या कोसळधार पावसावेळी (Heavy Rain) डिचोली तालुक्यातील (Bicholim) हरिजनवाडा-कासारपाल येथील राजेंद्र भीकारो परवार यांच्या घराच्या भिंतीची पडझड झाली. अशी माहिती डिचोलीचे मामलेदार प्रवीणजय पंडित यांनी दिली. तर बोर्डे आणि मये येथे मिळून दोन ठिकाणी रस्त्यावर झाडे कोसळली. या पडझडीत वित्तहानी वा अन्य आपत्ती ओढवली नाही. अशी माहिती डिचोली अग्निशमन दलाकडून मिळाली आहे. (Heavy rains cause houses to collapse in Bicholi)

मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. ठिकठिकाणी वाहतूक कोंडीचेही प्रकार घडले. लावणी आदी शेतीकामासाठी पूरक असा पाऊस पडत असला, तरी कोसळधार वृष्टीमुळे शेतीकामात अडथळा निर्माण होत आहे.

पावसाने रौद्रावतार धारण केला असला, तरी महाराष्ट्रातील तिळारी धरणातील पाण्याची पातळी मंगळवारी सायंकाळपर्यंत नियंत्रणात होती. अशी माहिती मिळाली आहे. मुसळधार पावसामुळे साळ गावातून वाहणाऱ्या शापोरा नदीच्या पाण्याची पातळी वाढून ही नदी तुडूंब भरल्याने 'तिळारी'तून जलविसर्ग सुरु झाला की काय, अशी भिती शापोरा नदीकाठच्या जनतेत पसरलेली आहे. मात्र, तिळारी धरणातील पाणी नियंत्रणात असून, तूर्त धरणातून जलनिसर्गाचा धोका नसल्याची माहिती धरण प्रकल्प सूत्रांकडून मिळाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vietnam Boat Accident: व्हिएतनाममध्ये मोठी दुर्घटना! 32 भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली; बचावकार्य सुरू

Tivare Village: तिवरे; हिरवाई, शेतीसंस्कृती आणि परंपरा जपणारे शांत गाव

Goa Mining: कावरे खनिज ब्लॉक; सरकारला दिलासा; खंडपीठाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

Goa Crime: कर्नाटक पोलिसांची म्हापशात धडक; चोरीच्या दागिन्यांचा तपास, गोव्यातील व्यवहार 'महत्त्वाचा दुवा'

Viral Post: इंजिनिअरिंग पूर्ण, 500 ठिकाणी नोकरीसाठी अर्ज... पण इंटरव्ह्यूसाठी एकही कॉल नाही; तरुणाची पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT