Goa Rain Update  Dainik Gomantak
गोवा

जोरदार पावसाने गोव्याला झोडपले

गुरुवारी सकाळपासूनच वातावरण ढगाळ होते. तापमानही कमी असल्याने लोकांना उष्म्यापासून दिलासा मिळाला.

दैनिक गोमन्तक

पणजी : राजधानी पणजीसह राज्‍यातील काही भागांमध्ये काल सायंकाळी 4 नंतर पाऊस सुरू झाला. रात्री उशिरापर्यंत अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. सायंकाळी कामावरून घरी जाणाऱ्या बेसावध चाकरमान्‍यांची मोठी गैरसोय झाली. हवामान खात्‍याने राज्‍यात गुरुवारी जोरदार पावसाची शक्‍यता वर्तवली होती. त्यानुसार रात्री 9 नंतर जोरदार पावसाला सुरवात झाली. त्यामुळे जनजीवन विस्कळित झाले. (Heavy rainfall in Goa)

गुरुवारी सकाळपासूनच वातावरण ढगाळ होते. तापमानही कमी असल्याने लोकांना उष्म्यापासून दिलासा मिळाला. सकाळी 11 च्‍या सुमारास पणजी शहरात पावसाच्‍या हलक्‍या सरी पडल्‍या. सायंकाळी आकाशात ढग दाटून आले. रात्री उशिरापर्यंत पाऊस पडत होता. वास्को शहरातही अनेक ठिकाणी पडझड झाली.

आज राज्‍यात 31.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मात्र, उद्यापासून तीन दिवस तापमानात किंचित वाढ होऊन ते 32 ते 33 अंश सेल्सिअस राहील. तसेच 20, 21, 22 आणि 23 मे रोजी राज्यात काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी हलक्‍या सरी कोसळतील, असे पणजी वेधशाळेने दिलेल्‍या प्रसिद्धीपत्रकात म्‍हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SCROLL FOR NEXT