Buimpal Dainik Gomantak
गोवा

Buimpal News: भुईपाल-भेडशेवाडा येथे झाड कोसळून वीजपुरवठा खंडित

Goa Rain: वीजतारा नसत्या तर झाड घरावर पडून नुकसान होण्याची शक्यता होती.

गोमन्तक डिजिटल टीम

शनिवार, ६ रोजी सायंकाळी ५ वा.च्या दरम्यान आलेल्या जोरदार वाऱ्यापावसामुळे भुईपाल-भेडशेवाडा येथील भैरो वरक यांच्या घराजवळील रस्त्यावर झाड उन्मळून वीजतारांवर पडले. यावेळी कोणत्याही प्रकारचे मोठे नुकसान झाले नाही. मात्र, काही वेळ वीजपुरवठा खंडित झाला होता तो वीज खात्याच्या कर्मचाऱ्यांनी येऊन सुरळीत केला.

या भागात शनिवारी सायंकाळी ५ वा.च्या सुमारास जोरदार पाऊस तसेच वादळ निर्माण झाले होते. या वादळाच्या तडाख्याने या भागात बऱ्याच झाडांची पडझड झाली. यामध्ये स्मिता मोटे यांच्या बागायतीमधील एक जांभळीचे झाड उन्मळून पडल्याने सुपारीच्या झाडांचे नुकसान झाले आहे.

तर भैरू वरक यांच्या घराजवळील किंदळीचे झाड उन्मळून वीजतारांवर अडकून पडले. यामुळे वीजपुरवठा खंडित झाला. वीजतारा नसत्या तर हे झाड घरावर पडून नुकसान होण्याची शक्यता होती.

या घटनेची माहिती वाळपई अग्निशमन दलाला तसेच होंडा वीजपुरवठा विभागाला देण्यात आली. त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन वीजतारांवर अडकून पडलेले झाड हटवून वीजपुरवठा सुरळीत केला. यावेळी अग्निशमन दलाचे एस.के. गावकर (सब ऑफिसर), ए.व्ही. नाईक (ड्रायव्हर ऑपरेटर), शेटकर, गावकर, गावकर (सर्व फायर फायटर) आदींनी झाड हटविण्याच्या कामात हातभार लावला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Bike Stunt Video: काळजाचं पाणी करणारा थरारक स्टंट! पठ्ठ्याचा डोकं चक्रावणारा व्हिडिओ व्हायरल; जीवाची लावली बाजी

Shani Gochar 2026: शनिदेव देणार 5 राशींना श्रीमंतीचं वरदान! हाती लागणार कुबेराचा खजिना; करिअरला मिळणार नवा बूस्ट

Colvale Jail Employee Stress: अभद्र युतीमुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा गुदमरतोय जीव! सुधारगृह गुन्हेगारांचा अड्डा; मानसिक आरोग्य कक्ष व छळविरोधी समित्यांची तातडीची मागणी

Crime News: आधी विषारी कोल्ड्रिंक पाजले, मग गळा आवळून केला खून! 20 वर्षांच्या संसारानंतर बायकोनेच नवऱ्याचा काढला काटा; कारण ऐकून व्हाल अवाक

Jitesh Kamat Colvale Jai: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाची सद्यस्थिती पाहता, 'गुन्हेगारांना आलिशान सुविधा पुरवणारे हॉलिडे होम' - जितेश कामत

SCROLL FOR NEXT