Panaji Rainfall Dainik Gomantak
गोवा

Panaji Rainfall: पणजीत अर्धा-पाऊण तासाच्या मुसळधार पावसाने रस्त्यावर पाण्याचे लोट; वाहनधारकांची तारांबळ

सांतीनेझ भागातील रस्ते पाण्याखाली

गोमंतक ऑनलाईन टीम

Panaji Rainfall: गोव्यात भारतीय हवामान विभागाने सलग तीन दिवस पावसाचा यलो अलर्ट दिलेला आहे. त्यात पहिल्याच दिवशी, मंगळवारी 27 जून रोजी दिवसभर पावसाची उघडझाप सुरू होती.

दरम्यान, राजधानी पणजी येथे रात्री नऊच्या सुमारास अर्धा-पाऊण तास झालेल्या मुसळधार पावसामुळे पणजीतील अनेक भागात पाणी साचले होते. एटीन्थ जून रस्ता परिसरात सर्वत्र पाणी साचले होते. अनेक दुचाकी वाहने रस्त्यावर साचलेल्या पाण्यात अडकली.

सांतीनेज भागातील अनेक सखल भाग पाण्याखाली गेले. येथील रस्त्यावरून पाण्याचे पाट वाहत होते. या पावसात वाहनधारकांची तारांबळ उडाली. अनेक रस्त्यांवर पाणी साचल्याने त्यातून वाट काढताना वाहनधारकांची कसरत होत होती.

पणजीत स्मार्ट सिटीची कामे सुरू असल्याने अनेक रस्ते खोदून ठेवले आहेत. काही रस्त्यांची कामे अपुरी आहेत. अनेच ठिकाणी रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य आहे. अशा स्थितीत या मुसळधार पावसाने प्रशासनाच्या उरलेल्या मर्यादाही उघड केल्या आहेत.

रस्त्यावर पाणी साचल्याने रस्त्याकडेला पार्किंगमध्ये लावलेली अनेक वाहने एक ते दीड फूट पाण्यात बुडली होती. सुमारे अर्धा ते पाऊण तास धोधो कोसळ्यानंतर पावसाचा जोर ओसरला.

दरम्यान, आणखी दोन दिवस पावसाचा जोर चांगला राहण्याची शक्यता आहे. राज्यातील विविध भागांमध्ये अतिवृष्टीचा इशारा गोवा वेधशाळेने दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT