Leakage At Ravindra Bhavan Dainik Gomantak
गोवा

Ravindra Bhavan Margao: मडगाव रवींद्र भवनलाही गळती; तियात्र कलाकारांकडून नाराजी व्यक्त

Leakage At Ravindra Bhavan: भवनच्या मुख्य दरवाजाच्या आत ब्लॅक बॉक्स सभागृहात जाण्याच्या वाटेवर सुद्धा पाणी गळत असल्याचे दिसून येत आहे

गोमन्तक डिजिटल टीम

सासष्टी : संततधार पडत असलेल्या पावसामुळे मडगावच्या रवींद्र भवनला गळती लागली असून पहिल्या मजल्यावर तळ्यांचे स्वरुप प्राप्त झाले आहे. आता पहिल्या मजल्यावरील कॉन्फरन्स सभागृहाबाहेर गळती सुरू झाली असून या प्रकाराबद्दल तियात्र कलाकारांनी नाराजी व्‍यक्‍त केली.

पहिल्‍या मजल्‍यावर या सगळीकडे पाणीच पाणी झाले असून हे पाणी पुसून काढण्‍यासाठी काही मजूर काम करताना दिसतात.

भवनच्या मुख्य दरवाजाच्या आत स्वागत कक्षात ब्लॅक बॉक्स सभागृहात जाण्याच्या वाटेवर सुद्धा पाणी गळत असल्याचे दिसून येत आहे. त्‍यामुळे तियात्र पहाण्‍यास येणाऱ्या प्रेक्षकांनाही त्‍याचा त्रास होऊलागला आहे.

या संदर्भात तियात्र कलाकार पास्कोल द चिखली म्हणाले, रवींद्र भवन हे कला व संस्कृतीचे केंद्र असून संपूर्ण गोव्यातील लोक इथे तियात्र पहायला येतात. तेव्हा रवींद्र भवनच्या कार्यकारी समितीने याची त्वरीत दखल घ्यावी व ही वास्तू सांभाळून ठेवण्याचा प्रयत्न करावा.

याबद्दल रवींद्र भवनचे अध्यक्ष राजेंद्र तालक याबाबत म्हणाले, आम्ही याची दखल घेतली आहे. आम्हाला त्याची जाणीव आहे. पण पाऊस एवढा पडत आहे, की त्वरित दुरुस्तीचे काम हातात घेणे कठीण आहे.

आम्ही या पूर्वीच दुरुस्तीसाठी वेगवेगळ्या कामांची यादी तयार केली आहे. त्यात वॉटरप्रुफींगच्या कामाचा समावेश आहे. मात्र पाऊस थांबल्यावरच हे काम प्राधान्यक्रमाने हातात घेतले जाईल. चिंता करण्याची काहीच गरज नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT