Monsoon in Goa  Gomantak Digital Team
गोवा

Monsoon 2023 : सर आली धावून... उकाडा गेला वाहून! राज्यभर पावसाच्या सरी

हवेत गारवा पसरल्याने आनंद; सगळीकडे पाणीच पाणी

दैनिक गोमन्तक डिजिटल

राज्यातील मॉन्सूनची तारीख उलटून गेली तरी पावसाचा पत्ताच नसल्याने व वाढत चाललेल्या उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना शनिवारी (ता.10) सकाळी पडलेल्या जोरदार पावसाने सुखावले.

साखळीत सकाळी काही प्रमाणात ऊन आल्यानंतर पावसाचे ढग दाटून आले व १०.३० वा.च्या सुमारास दमदार पाऊस पडला. मॉन्सून केरळात दाखल झाल्यानंतर गोव्यात आनंदाचे वातावरण पसरले होते.

आता कोणत्याही क्षणी पाऊस बरसण्याची शक्यता प्रत्येकजण व्यक्त करीत होता. त्याचप्रमाणे गेले दोन दिवस ढगाळ वातावरण अधूनमधून दिसून येत होते. शनिवारी सकाळी मात्र पावसाची चाहूल देणारे वातावरण निर्माण झाले आणि पावसाने दमदार बरसात केली.

नाले वाहू लागले

या पावसामुळे सर्व गटर, नाले वाहू लागले होते. काही ठिकाणी गटरांमध्ये कचरा साचल्याने पाणी रस्त्यावर आले होते. या पाण्याबरोबर दगड-मातीही रस्त्यावर आली होती. याचा वाहनचालकांना त्रास होत होता. तरीही साखळी नगरपालिकेतर्फे सर्व गटरांची साफसफाई विक्रमी वेळेत करण्यात आल्याने तशी मोठी समस्या जाणवली नाही.

ढगाळ वातावरण

या पावसामुळे वातावरण थंड झाले होते. त्यामुळे काही प्रमाणात लोकांना असह्य उकाड्यातून दिलासा मिळाला होता. त्यानंतर जरासे ऊन आल्याने पुन्हा उकाडा जाणवू लागला होता. परंतु संध्याकाळी पुन्हा पावसाने वातावरण ढगाळ केल्याने थंडावा निर्माण झाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT