Heavy night traffic continues through Chorla Ghat  Sanjay Ghugretkar
गोवा

चोर्ला घाटातून रात्रीची अवजड वाहतूक सुरूच

आदेशाची खिल्ली; पोलिस आकारतात केवळ दंड

दैनिक गोमन्तक

पर्ये: चोर्ला घाटातील रस्त्याचे डांबरीकरण सुरू केल्याने 4 ते 11 मेपर्यंत घाट रस्ता अवजड वाहतुकीसाठी बंद करण्याचे आदेश सरकारने दिले होते. पण, या आदेशाची खिल्ली उडवत मार्गावरून रात्रीच्या वेळी अवजड वाहतूक सुरूच असल्याचे आढळून आले आहे. या मार्गावरून दिवसा प्रवासी बसेस व इतर दुचाकी आणि चारचाकी वाहतूक सुरू आहे.

रात्रीचा मालवाहू तसेच खडी वाहतूक करणारे ट्रक रात्रीची मोठ्या प्रमाणात वाहतूक करतात. दरम्यान ही रात्रीच्या घाटातून येणारे अवजड वाहने केरीतील पोलिस चौकीवर अडवले जातात. पण, या अवजड वाहनचालकांना दंड आकारून सोडले जाते.

दरम्यान, चोर्ला घाट रस्ता अवजड वाहतुकीसाठी बंद केल्याचा आदेश दिला त्याचदिवशी रात्रीच्या वेळी दोन अवजड वाहनांचा अपघात झाला होता. त्या अपघातात दोन्ही ट्रकचे मोठे नुकसान झाले होते. सदर अपघात झाल्यानंतर सरकारच्या आदेशाची खिल्ली उडवली जाते हे त्याचदिवशी स्पष्ट झाले होते. पण त्यानंतरही या आदेशाचे पालन केले जात नाही.

डांबरीकरणाला जोरदार सुरवात

दरम्यान या घाट मार्गाचे डांबरीकरण 4 रोजी जोरदारपणे सुरवात झाले होते. या चार दिवसांत घाटाचा बराच रस्ता डांबरीकरण झाला आहे. आज संध्याकाळपर्यंत अंजुणे धरणापर्यंत रस्त्याचे काम झाले आहे. साखळीपर्यंत या रस्त्याचे डांबरीकरण केले जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Usha Nadkarni: पतीशी कोणतंही नातं नाही, मुलगा आई मानत नाही... 80 व्या वर्षीही एकट्याच आयुष्य जगतात उषा नाडकर्णी, वैयक्तिक आयुष्याबाबत मोठा खुलासा

Sexual Assault Case: लैंगिक अत्याचार प्रकरणात तरुण तेजपालला 10 वर्षांची शिक्षा! हायकोर्टाकडून 2 आठवड्यात सरेंडरचा आदेश

Gujrat Well Water Waves: निसर्गाचा अद्भूत चमत्कार! विहिरीत अचानक उठल्या समुद्रासारख्या लाटा! गुजरातमधील रहस्यमय घटनेनं सगळेच हैराण Watch Video

Viral Stunt Video: वयाच्या 97 व्या वर्षीही जबरदस्त जिद्द! आजीने उडत्या विमानातून केला थरारक स्टंट, नेटकरी हैराण; एकदा पाहाच हा व्हायरल व्हिडिओ

खरी कुजबूज: खोलकरही नांगी टाकणार?

SCROLL FOR NEXT