Fog in Goa Dainik Gomantak
गोवा

Goa : गोव्यात सर्वत्र दाट धुक्याची चादर; वाहतूकही मंदावली

धुक्यासह गोव्यात थंडीचा कडाकाही वाढल्याने जनजीवनावर परिणाम

आदित्य जोशी

Fog in Goa: गोव्यात सर्वत्र दाट धुक्याची चादर पसरल्याने वाहतूक मंदावली आहे. गेल्या आठवड्याभरापासून गोव्यात कडाक्याची थंडी पडत आहे. यासोबतच गेल्या काही दिवसांत धुकंही पडण्याचं प्रमाण वाढलं आहे. मात्र आज सोमवारी सकाळी गोव्यात प्रचंड धुकं पसरल्याने दृश्यमानता कमी झाली होती. साहजिकच सर्व मार्गांवरील वाहतूक धिम्या गतीने सुरु होती.

गील 3-4 दिवसांपासून गोव्यातील तापमान 20 अंश च्या खाली आले असून सोमवारी सकाळी गोव्यात दाट धुके पसरले होते. या दाट धुक्याचा सामना सोमवारी सकाळी कामावर निघालेल्या नोकरदार वर्गाला करावा लागला.

चोडण- रायबंदर येथील फेरीबोट सेवेला धुक्याचा फटका बसला. धुक्यामुळे फेरी सेवा काही प्रमाणात विस्कळीत झाली होती. वेळेवर फेरी न सुटल्याने फेरी पॉईंटजवळ (धक्क्यावर) काहीकाळ वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. फेरी प्रमाणेच रस्ते वाहतुकसुद्धा धीम्यागतीने सुरु होती.

सोमवारी पहाटे गोव्यातील अनेक भागांमध्ये दाट धुके अनुभवायला मिळाले. या धुक्याचा सामना सकाळी कामावर निघणाऱ्या लोकांना करावा लागला. या बदलत्या वातावरणाचा लोकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: घरच्यांनी सून म्हणून नाकारलं, ज्याच्यावर जीवापाड प्रेम केलं त्यानचं घात केला; बायकोचा काटा काढणारा नराधम अखेर गजाआड

Viral Video: प्रवाशांची गर्दी अन् चोरट्याचा प्लॅन तयार! दिल्ली मेट्रोमध्ये बिनधास्त चोरी; कॅमेऱ्यात कैद झालेला व्हिडिओ चर्चेत

Saleli Car Fire: सालेलीत कार आगीत जळून भस्‍मसात; 5 लाख रुपयांचे नुकसान; गाडीनं अचानक पेट घेतल्‍यानं खळबळ

Colombia Earthquake: जमीन फाटली अन् इमारती कोसळल्या, डोळ्यांदेखत उडाली दाणादाण! कोलंबियातील भीषण भूकंपात 132 मृत्यू, 1500 हून अधिक घरे उद्ध्वस्त VIDEO

New Head Coach: वर्ल्ड कपच्या तोंडावर मोठा निर्णय; मुख्य प्रशिक्षक बदलला, आता 'या' व्यक्तीवर मोठी जबाबदारी

SCROLL FOR NEXT