Hearse inauguration in vasco  Dainik Gomantak
गोवा

Goa: नवेवाडे सुन्नी युथ संघटनेतर्फे शववाहिकेचे लोकार्पण

नवेवाडे सुन्नी युथ संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी गरजूंना अंत्यविधी वेळी मोफत शववाहिका भेट देऊन मोठे समाजकार्य केले आहे.

दैनिक गोमन्तक

जीवनात गरिबांना सहकार्य करताना त्यांच्या सुखदुःखात आपला सहभाग दाखवावा. आपले समाज कार्य सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वांनी एकसंघ होणे महत्त्वाचे आहे. तेव्हाच आपले कार्य समाजापुढे येते. युवकांनी शिक्षण, क्रीडा क्षेत्रात नावलौकिक प्राप्त करताना समाजकार्यात सुद्धा आपला सहभाग दाखवावा असे प्रतिपादन उत्तर गोव्याचे वाहतूक पोलिस उपअधीक्षक शेख मोहम्मद सलीम यांनी केले.

वास्को मायमोळे येथील कब्रस्तान सभाग्रहात नवेवाडे सुन्नी युथ संघटनेतर्फे शववाहिकेचे लोकार्पण प्रमुख पाहुणे उत्तर गोव्याचे वाहतूक पोलिस उपअधीक्षक शेख मोहम्मद सलीम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांच्या समवेत आदम शेख, नजीर खान, जमीर करोल, रियाज कादरी, नियाजी शेख, संघटनेचे अध्यक्ष रिजवान खान, सचिव समीर पालेदार, हाजी शेख, मुस्ताक शेख, हरीफ शेख, निसार मिर, मोहम्मद अली, मोसिन खान, जावेद सय्यद, फिरोज आगा, फैय्याज खान, रियाज शेख, अल्लाबक्ष सय्यद, शब्बीर शेख, यासीन सय्यद व इतर मुस्लिम समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते.

पुढे बोलताना वाहतूक पोलिस उपअधीक्षक शेख सलीम म्हणाले की नवेवाडे सुन्नी युथ संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी गरजूंना अंत्यविधी वेळी मोफत शववाहिका भेट देऊन मोठे समाजकार्य केले आहे. संघटनेचे अध्यक्ष रिजवान खान याने शववाहिका २४तास मुस्लिम समाजाबरोबर सर्व धर्मियांसाठी मानवतेच्या आधारे मोफत शववाहीकेचे मोफत लोकार्पण करण्यात असल्याची माहिती अध्यक्ष खान यांनी दिली. शववाहीकेची गरज भासल्यास नवेवाडे सुन्नी युथ संघटनेच्या सदस्याकडे संपर्क साधावा. यासाठी ९९२३९३९५०६, ८७८८८७६३६१, ९२८४२१८९१०, ९९२३७४९६९९ यांना संपर्क साधावा असे संघटनेतर्फे कळविण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: 'गोवा काँग्रेस' नावाला काँग्रेसचा आक्षेप; गिरीश चोडणकरांची गोवा खंडपीठात धाव, निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर सवाल

Birch By Romeo Lane Fire: लुथरा बंधूंसह अजय गुप्ताचा जामीन रद्द; 2 आठवड्यांत आत्मसमर्पणाचे गोवा हायकोर्टाचे आदेश

Double Murder Case: रक्षाबंधनाच्या तोंडावर रुडकीत दुहेरी हत्याकांड! भावानेच दोन सख्ख्या बहिणींची गोळ्या झाडून केली हत्या; काळजाचा ठोका चुकवणारा थरार

Tarun Tejpal Case: तेजपालला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का; 3 आठवड्यांत तुरुंगात आत्मसमर्पण करण्याचे आदेश

Goa E20 Petrol: 'ई-20'चा सर्वाधिक फटका गोव्याला? केजरीवालांचा भाजप सरकारवर निशाणा; 40 टक्क्यांहून गोमंतकीयांकडे चारचाकी

SCROLL FOR NEXT