Mavin Gudhino Dainik Gomantak
गोवा

वीजबिल घोटाळ्याप्रकरणी 21 जूनला सुनावणी

या प्रकरणी सध्या दक्षिण गोवा सत्र न्यायालयात सुनावणी सुरू आहे.

दैनिक गोमन्तक

मडगाव : माजी वीजमंत्री माविन गुदिन्हो (विद्यमान पंचायतमंत्री) हे प्रमुख आरोपी असलेल्या 5.50 कोटी रुपयांच्या वीजबिल घोटाळा प्रकरणाची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्हिन्सेंट डिसिल्वा यांनी 21 जूनपर्यंत तहकूब केली. या घोटाळ्यात सहभागी असलेल्या एका कंपनीच्या अधिकाऱ्याने आपल्यावरील खटला रद्द करावा यासाठी अर्ज केला आहे. या अर्जावर जून महिन्यात युक्तिवाद होणार आहे. तर, खटल्यातून आपल्याला वगळावे यासाठी गुदिन्हो यांनीही अर्ज केला होता.

काँग्रेस सरकारमध्‍ये वीजमंत्री असताना गोव्यात कारखाने यावेत यासाठी त्‍यांना आकर्षित करण्‍यासाठी सरकारने काही प्रमाणात वीजबिल माफी जाहीर केली होती. ही योजना संपूनही गुदिन्हो यांनी वीज खात्यातील काही कर्मचाऱ्यांना हाताशी धरून काही कंपन्यांना पूर्वलक्षी पद्धतीने वीजबिल माफी देऊन राज्य सरकारचे साडेपाच कोटी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप या प्रकरणात तपास करणाऱ्या क्राईम ब्रँचने करून गुदिन्हो आणि इतरांवर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी सध्या दक्षिण गोवा सत्र न्यायालयात सुनावणी सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT