Arjun Velip Dainik Gomantak
गोवा

अर्जुन वेळीप यांच्या आव्हान अर्जावर 29 नोव्हेंबरला सुनावणी

सरकारी नोकरीचा राजीनामा पंचायत खात्याने फेटाळून लावल्याने त्या निर्णयाला वेळीप यांनी मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) आव्हान दिले असून हा आव्हान अर्ज आता 29 नोव्हेंबर रोजी सुनावणीस येणार आहे.

दैनिक गोमन्तक

मडगाव: उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर (Deputy Chief Minister Babu Kavalekar) यांच्या विरोधात केपे मतदारसंघातून निवडणूक लढविणारच या इरेला पेटलेले कवळेकरांचे पूर्वीचे स्वीय सहाय्यक अर्जुन वेळीप यांनी दिलेला सरकारी नोकरीचा राजीनामा पंचायत खात्याने फेटाळून लावल्याने त्या निर्णयाला वेळीप यांनी मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) आव्हान दिले असून हा आव्हान अर्ज आता 29 नोव्हेंबर रोजी सुनावणीस येणार आहे. यासंदर्भात आज न्यायालयाने राज्याच्या एडव्होकेट जनरलच्या कार्यालयात नोटीस पाठविली आहे. या याचिकेत मुख्य सचिवांसह पंचायत सचिवांना आणि पंचायत संचालकांना प्रतिवादी करण्यात आले आहे.

वेळीप हे पंचायत सचिव म्हणून काम करीत असून त्याना विधानसभा निवडणूक लढवायची असल्याने त्यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला होता. मात्र त्यांच्याविरोधात चौकशी प्रलंबित असल्याचे कारण पुढे करून त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला नव्हता. वेळीप यांनी या निर्णयाला आव्हान देत असताना यामागे राजकारण असल्याचा दावा केला आहे. आपल्याविरोधात जी तक्रार दाखल झाली होती तीही राजकीय विरोधातूनच झाली होती. मात्र त्या आरोपात काहीच तथ्य न सापडल्याने ती चौकशी आटोपती घेण्यात आली होती. मात्र आता आपल्याला निवडणूक लढविण्यापासून रोखण्यासाठी हे जुने शितपेटीत असलेले प्रकरण पुन्हा उकरून काढले आहे असा दावा वेळीप यांनी केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT