Pratap Singh Rane Dainik Gomantak
गोवा

प्रतापसिंह राणेंविरुद्धची सुनावणी तहकूब...

4 मे रोजी सुनावणी

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांना देण्यात आलेल्या आजीवन कॅबिनेट दर्जाविरोधात सादर केलेल्या याचिकेवर काल गोवा खंडपीठासमोर सुनावणी न होता ती आता येत्या 4 मे रोजी ठेवण्यात आली आहे.

गेली 50 वर्षे गोवा विधानसभेत आमदार म्हणून कार्यकाळ पूर्ण केल्याने राज्य सरकारने राणे यांना आजीवन कॅबिनेट दर्जा देण्याचा निर्णय घेऊन त्याची अधिसूचनाही जारी केली. राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या भारतीय घटनेनुसार 12 निश्‍चित असल्याने राणे यांना हा दर्जा दिल्याने ती 13 वर जाते. घटनेनुसार ते कायद्याच्या चौकटीत बसत नाही. त्यांच्यावरील खर्चाचा भूर्दंड करदात्यांना बसणार आहे. त्यामुळे ही अधिसूचना रद्द करण्याची मागणी करणारी याचिका ॲड. आयरिश रॉड्रिग्ज यांनी जारी केली आहे. गोवा खंडपीठाने मागील सुनावणीवेळी सरकार व प्रतापसिंह राणे यांना नोटीस बजावून बाजू मांडण्यास सांगितले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral News: मुस्लिम पती, 5 मुलं अन् 45 वय; आता 26 वर्षांनी लहान हिंदू प्रियकरासोबत मंदिरात थाटला संसार! 'सीमा'ची अजब प्रेम कहाणी

SAFF Championship Final: भारताचा बांगलादेशला 'धोबीपछाड'! 3-1 च्या फरकाने उडवला धुरळा, विक्रमी सहावे विजेतेपद पटकावले

Goa Congress: 'काँग्रेस'कडे 2027 साठी नक्की काय प्लॅनिंग आहे? गिरीश चोडणकर 'भाजप'चे तगडे आव्हान कसे पेलणार?

Margao Fish Market: मडगाव 'मासळी मार्केट'ची इमारत बांधून वर्ष उलटलं, पण उद्घाटनाला मुहूर्त मिळेना! व्यापारी आणि मच्छीमार संभ्रमात

Goa Schools Reopening: उन्हाळी सुट्टीनंतर परत वाजली शाळांची घंटा! डिचोलीतील शाळांत 95 टक्क्यांहून अधिक उपस्थिती; नवीन विद्यार्थ्यांचे औक्षण

SCROLL FOR NEXT