Court Dainik Gomantak
गोवा

Congress MLA: 10 फुटीर काँग्रेस आमदारांविरोधातील चोडणकरांच्या याचिकेवर वर्षानंतर सुनावणी

काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी 10 फुटीर आमदारांविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

दैनिक गोमन्तक

पणजी: काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी 10 फुटीर आमदारांविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. दरम्यान ही सुनावणी पुढे ढकलण्याची चोडणकर यांच्या वकिलांनी मागणी केल्यामुळे न्यायालयाने सुनावणी वर्षभर पुढे ढकलली आहे.

(Congress MLA)

24 फेब्रुवारी रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने 2019 मध्ये सत्तेत असणाऱ्या काँग्रेसमधील 10 तर मगो च्या दोन आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्याविरोधात चोडणकर यांनी तसेच मगोतर्फे सुदिन ढवळीकर यांनी वेगवेगळ्या याचिका सभापतींकडे दाखल केल्या होत्या.

'त्या' दहा आमदारांविरोधात चोडणकर सर्वोच्च न्यायालयात

काँग्रेसने 'त्या' दहा आमदारांविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेत राजकीय समिकरणांची दिशाच बदलली आहे. राज्यातील 12 आमदारांविरोधात काँग्रेस व मगो पक्षातर्फे दाखल करण्यात आलेल्या आमदार अपात्रता याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने निवाडा देताना ती फेटाळली होती. त्यामुळे त्या बारा आमदारांना व पात्रता पासून दिलासा मिळाला होता. त्या निर्णयाविरोधात काँग्रेस पक्षाने सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले. 

तसेच गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर म्हणाले की, आम्ही अपात्रतेच्या प्रकरण सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. तसेच दोन-तृतीयांश आमदारांनी आपला पक्ष बदलत असताना राजकीय पक्षाचे विलीनीकरण ही पूर्व अट असावी.

अखेर 'त्या' बंडखोर आठ आमदरांविरोधात अपात्रता याचिका दाखल

काँग्रेसच्या आठ आमदारांनी सप्टेंबर 14, 2022 रोजी पक्षांतर करून भाजपमध्ये प्रवेश केला. जवळपास तीन महिन्यानंतर अखेर कांग्रेसने 'त्या' बंडखोर आठ आमदरांविरोधात अपात्रता याचिका दाखल केली आहे. काही माहितीसाठी आम्ही थांबलो होतो, त्यामुळे जरा उशिर झाला. अशी माहिती हळदोणेचे आमदार अ‍ॅड. कार्लुस फेरेरा यांनी दिली. यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर याचिकार्ते आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT