Gomeco Hospital Dainik Gomantak
गोवा

गोमेकॉ इस्पितळ परिसरात साचले कचऱ्याचे ढीग

पर्दाफाश: आमदार वीरेश बोरकर यांची आकस्मिक भेट

दैनिक गोमन्तक

पणजी: रेव्होल्युशनरी गोवन्सचे आमदार विरेश बोरकर यांनी विधानसभेत पाऊल ठेवल्यापासून कामाचा धडाकाच लावला आहे. सांत आंद्रे मतदारसंघातील कामांचा आढावा घेत ती पूर्ण करण्यास सुरुवात केली आहे. आज त्यांनी गोमेकॉ इस्पितळाच्या आवारात भेट दिली. या इस्पितळाच्या इमारतीच्या मागील बाजूला असलेल्या कचऱ्याच्या ढिगाबाबत अधिकाऱ्यांना विचारणा करत तो त्वरित उचलण्याच्या सूचना केल्या व सरकारचा बेजबाबदारपणा निदर्शनास आणून दिला आहे.

ज्या धडाडीने रेव्होल्युशनरी गोवन्स पक्षाने निवडणुकीत लोकांना आश्‍वासने दिली होती ती पूर्ण करण्याचे काम आमदार वीरेश बोरकर याने सुरू केले आहे. त्यांनी आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास गोमेकॉ इस्पितळाच्या नव्या इमारतीतील विविध वॉर्डमध्ये जाऊन तेथील शौचालयांची तसेच रुग्णांना मिळणाऱ्या सेवेबाबत चौकशी केली. यावेळी वॉर्डमधील परिचारिका तसेच रुग्णांनाही काय चालले आहे याचा अंदाज आला नाही. आमदार बोरकर हे नवीनच चेहरे असल्याने ते परिचयाचे नव्हते. त्यामुळे वॉर्डमधील कर्मचारी वर्गही गोंधळून गेला. वॉर्डमधील शौचालये अस्वच्छ तसेच नळांना पाणी नसल्याच्या तक्रारी निवडणुकीपूर्वी प्रचार करताना लोकांकडून आल्या होत्या. त्यामुळे त्यांनी त्याचा आढावा घेण्यासाठी गोमेकॉ इस्पितळ व्यवस्थापन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत फेरफटका मारला.

आमदार वीरेश बोरकर यांनी इस्पितळाच्या वॉर्डमध्ये फेरफटका मारल्यानंतर त्यांनी इमारतीच्या सभोवताली पाहणी केली. यावेळी या इमारतीच्या मागील बाजूने कचरा मोठ्या प्रमाणात साचलेला आढळून आला. काही ठिकाणी इस्पितळातील प्लास्टीकचा कचरा तेथील उघड्यावर टाकून देण्यात आला होता. यासंदर्भात त्यांनी इस्पितळ अधिकाऱ्यांकडे चौकशी केली व हा कचरा रुग्णांसाठी धोकादायक असल्याने त्याची लवकर विल्हेवाट लावण्याची सूचना केली. काही दिवसांनी पुन्हा या इस्पितळाला भेट देऊ त्यावेळी तेथून हटवण्यात आलेला असेल अशी अपेक्षा आहे.

हल्लीच काही दिवसांपूर्वी पंचायत सचिवाच्या गैरहजेरीमुळे लोकांची कामे वेळेत होत नाही याची दखल घेऊन त्यांनी पंचायतीला भेट दिली तेव्हा सचिव गैरहजर होता. तो पंचायतीमध्ये येतच नव्हता. इतर पंचायतीचा ताबा असल्याचे बतावणी करून तो कामचुकारपणा करत होता. आमदार वीरेश बोरकर यांनी या प्रकरणाची दखल घेऊन पंचायतीच्या वरिष्ठांकडे तक्रार केल्यावर त्याची तेथून बदली केली गेली आहे. रेव्होल्युशनरी गोवन्स पक्षाची जी आक्रमकता आहे ती आमदार बोरकर यांनी आपल्या कामातून कृती करण्यास सुरुवात केली आहे. .

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim Market: डिचोली बाजारात आकर्षक रेनकोट, छत्र्या उपलब्ध; 15 टक्के दर वाढले, तरीही खरेदी उत्साहात सुरू

Labh Drishti Yog 2026: मंगळ-गुरुच्या संयोगाने बनतोय 'लाभ दृष्टी योग'! 3 राशींचे लोक होणार मालामाल; नोकरीत मिळणार मोठी पगारवाढ

Viral Post: 'कंजूष' कंपनीची करामत!पगारवाढीच्या बदल्यात कर्मचाऱ्यांना दिलं 1 लीटर पाणी अन् बिस्किट! पोस्ट होतेय व्हायरल

Bicholim Bus Stand: डिचोली बसस्थानकात बेशिस्तपणा; वाहतूक कोंडी, अपघाताच्या धोक्याने प्रवासी त्रस्त

Goa Politics: आमदार वीरेश बोरकरने मनोजला दिले आव्हान! संस्थापक सदस्य, समित्य‍ांशी चर्चेअंतीच पुढील निर्णय

SCROLL FOR NEXT