Goa Agriculture |Vegetables Dainik Gomantak
गोवा

Goa Agriculture: शहरी भागातदेखील फुलले आरोग्यदायी भाज्यांचे मळे

गावांत मोठे उत्पादन : ताळगावात पिकणाऱ्या रताळ्यांना मागणी

दैनिक गोमन्तक

Goa Agriculture: शहरी भागात आपल्याला केवळ मोठमोठ्या इमारती, गाड्यांचा गोंगाट आणि नव्याने सुरू असलेली इमारतीची बांधकामे दिसतात; परंतु राजधानी पणजीलगत ताळगावात आजही अनेक शेतकरी आपली परंपरागत शेती करतात.

पालेभाज्या, फळभाज्यांसहित मिरची व कांद्याची लागवड करण्यात येते. तसेच ताळगाव परिसरात पिकणाऱ्या रताळ्यांना अधिक मागणी असते.

राज्यात रब्बी हंगामानिमित्त विविध प्रकारची पिके शेतकऱ्यांद्वारे घेण्यात येत आहेत. राज्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात शेतकरी भाज्यांचे उत्पादन घेत असून यात प्रामुख्याने लालभाजी, चिटकी, भेंडी, दुधी भोपळा, वांगी, मुळा, पालक, वाली, दोडकी, काकडी, रताळी आदी भाज्यांसहित मिरची, कांदा लागवडदेखील मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे.

पिकांवर पडतेय कीड

पिकांवर पडणाऱ्या किडीबाबत कृषी संचालक नेविल आल्फोन्सो म्हणाले, पिकांच्या किडीपासून बचावासाठी विविध प्रकारच्या किटकनाशकांचा वापर करणे गरजेचे आहे. पिकाच्या सकस वाढीसाठी लागणारे विविध घटक, पाणी, खत चांगल्या प्रकारे वेळेवर पुरविणे गरजेचे आहे.

फलोत्पादन महामंडळात भाजी विक्री

राज्यातील शेतकरी नारळ, सुपारीच्या पिकासोबतच हंगामी उत्पादनदेखील घेतात. अनेक शेतकरी फलोत्पादन महामंडळाला आपली भाजी विकत असतात तर काही शेतकरी आठवडी बाजारात आपले उत्पादन विकत असतात. शहरी भागातील ग्राहकांचा कल हा स्थानिक उत्पादने खरेदीकडे अधिक असतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT