Health Minister Vishwajit Rane on rising cases of Dengue & Malaria Dainik Gomantak
गोवा

डेंग्यू नियंत्रणासाठी आरोग्य मंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक

आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांच्याकडून नगरपालिकांना निधी मंजूर

दैनिक गोमन्तक

पणजी : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वाढू शकणाऱ्या डेंग्यू आणि मलेरियावर नियंत्रण आणण्यासाठी आरोग्य प्रशासनाने आज तातडीची बैठक बोलवत आरोग्य कर्मचारी आणि नगरपालिका प्रशासनाला सतर्क केले आहेत. राज्याचे आरोग्य मंत्री आणि नगर नियोजन मंत्री विश्वरजित राणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीला नगर विकास सचिव वर्मा आणि आरोग्य सचिव राजशेखर उपस्थित होते. (Health Minister Vishwajit Rane on rising cases of Dengue & Malaria)

याबाबत बोलताना राणे म्हणाले की, राज्यामध्ये अनेक ठिकाणी नवीन बांधकाम प्रकल्प सुरू आहेत. अशातच पावसाळा सुरू झाल्याने ठिकठिकाणी पाणी साठत आहे. यामुळे डेंग्यू आणि मलेरिया डासांची पैदास होत आहे. त्यामुळे प्रामुख्याने डेंग्यू रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. याकरिता राज्यातील सर्व पालिका मुख्याधिकारी आणि आरोग्य प्रशासनाने सतर्क होणे गरजेचे आहे. ज्या ठिकाणी बांधकाम कामगारांची संख्या मोठी आहे, अशा सर्व कामगारांना हेल्थ कार्ड पूर्ववत त्यांच्या आरोग्याची नियमित तपासणी करावी.

बाधित रुग्णांना नियमित उपचार द्यावेत. डास पैदास रोखण्यासाठी पालिकांना फॉगिंग मशीन आवश्यक आहे, त्यांनी त्याची मागणी तातडीने नोंदवावी याबरोबरच ज्या ठिकाणी पाणी साचत असेल तर त्या पाण्याचा निचरा करावा. तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांनी ज्या ठिकाणी डेंग्यूचे रुग्ण सापडले आहेत त्या परिसराला सातत्याने भेटी देऊन संबंधित नागरिकांना सूचना देऊन परिसरात डास निर्मिती होणार नाही याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. अशा सुचना त्यांनी यावेळी दिल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT