Vishwajit Rane  Dainik Gomantak
गोवा

'बंगाल'ने मदत नाकारल्याने ‘त्या’ महिलेवर गोव्यात उपचार

आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी घेतली दखल

दैनिक गोमन्तक

पणजी : आर्थिक अडचणींमुळे महागातला उपचार होऊ शकत नाही. त्याचबरोबर बंगालमधील ममता बॅनर्जी सरकारनेही मदतीपासून किनारा केल्याने कोलकात्यातील 51 वर्षीय महिलेवर गोव्याचे आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांनी मोफत उपचार करण्याचे आश्‍वासन दिले आहे. या उपचाराचा खर्च स्वतः मंत्री राणे उचलणार आहेत. केंद्र सरकारच्या आयुष्यमान कार्ड ही योजना बंगालमध्ये लागू करण्यात आली नसल्याने त्या महिलेला स्तनाच्या कर्करोगावर उपचार करणे अवघड होऊन बसले होते.

स्तनाचा कर्करोग असल्याने त्या महिलेला उपचारासाठी कोलकात्यामध्ये 15 लाख रुपये खर्च येणार होता. ही खर्चाची रक्कम उभा करणे या कुटुंबाला शक्य नव्हते. त्यामुळे ही बाब गोव्याचे मुख्यमंत्री विश्वजित राणे यांच्या कानावर पडली. त्यांनी तत्काळ त्या महिलेच्या पतीबरोबर संपर्क साधण्याची व्यवस्था केली. त्यांना त्या महिलेवर गोव्यात मोफत उपचार करण्यात येईल, अशी ग्वाही दिली.

रुबी कौर यांच्या आजाराची माहिती मिळाल्याने राणे यांनी यंत्रणेला सत्येंद्र सिंह यांचा नंबर शोधून काढायला सांगितला. सत्येंद्र यांच्याशी संपर्क झाल्यानंतर मंत्री राणे यांनी त्यांना रुबी यांच्या उपचाराविषयी माहिती घेतली आणि गोव्यात त्यांच्यावर उपचार केले जातील, तो खर्च आपण करणार आहे, अशी माहिती राणे यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Record: 22 षटकार, 17 चौकार… टी20 क्रिकेटमध्ये ठोकलं 'द्विशतक', 140 किलो वजनाच्या खेळाडूनं घातला धुमाकूळ; गोलंदाजांच्या उडवल्या चिंधड्या

Strait of Hormuz: इराणचा अमेरिकेला 'डिजिटल' दणका! होर्मुजच्या सामुद्रधुनीतील इंटरनेट केबल्सवर नियंत्रण मिळवण्याची तयारी; जागतिक दळणवळण धोक्यात

Shani Gochar 2026: शनीदेवाचा रेवती नक्षत्रात धमाका! 2 जुलैपासून 'या' 3 राशींना लागणार लॉटरी; उत्पन्नात होणार मोठी वाढ

पेडण्यात सिंधुदुर्गची ताजी मासळी, रखडलेल्या प्रकल्पामुळे सुविधांचा अभाव; ग्राहकांचा नाईलाज

Goa Assembly Election 2027: गोव्यात आगामी सरकार काँग्रेसचेच! अमित पाटकरांनी व्यक्त केला विश्वास; केरळ, तमिळनाडू विजयाबद्दल काँग्रेसकडून जल्लोष

SCROLL FOR NEXT